वर्धा,
Shambhuva Mule memorial music concert, संगीत सभेचा कार्यक्रम शनिवार २७ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सार्वजनिक वाचनालयात आयोजित करण्यात आला आहे. वर्धेतील प्रतिभावान कलाकार अमित लांडगे त्यांच्या साथीदारासह यावर्षीच्या कार्यक्रमात शास्त्रीय, नाट्य तसेच भती गीतांचे गायन प्रस्तुत करणार आहे.
स्व. शामबुवा मुळे यांनी अंबिका संगीत विद्यालयाची स्थापना १९२८ साली वर्धेत करून संगीत साधनेचा पाया रचला. वर्धेच्या सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी ग्वाल्हेरच्या शंकर गांधर्व विद्यालय, लष्कर येथून संगीताची उपाधी प्राप्त केली होती. अशा या ज्येष्ठ संगीत साधकाच्या स्मृतीप्रित्यर्थ वर्धेत १९९७ सालापासून दरवर्षी शास्त्रीय संगीत सभेचा कार्यक्रम त्यांचे चिरंजीव विजय मुळे स्व. शामबुवा मुळे स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित करीत असतात.
या कार्यक्रमात आतापर्यंत आशा खाडीलकर, देवकी पंडित, कल्पना झोकरकर, श्रावणी शेंडे, आरती अंकलीकर टिकेकर, पंडित जयतीर्थ मेहुंडी, पंडित श्रीनिवास जोशी, पंडित आनंद भाटे व अनिरुद्ध देशपांडे अशा ख्यातमान गायकांनी हजेरी लावलेली आहे. वर्धेतील संगीत प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मुळे परिवारातर्फे करण्यात आले आहे.