दावलामेठी येथे साईनाथ कॉलेजचे शिबिर

25 Dec 2025 16:39:41
नागपूर,
Shree Sainath College श्री साईनाथ कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने NSS च्या बॅनरखाली १५ ते २१ डिसेंबर या कालावधीत दावलामेठी गावात विशेष NSS शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी अन्विती फाउंडेशनच्या शेफाली दुधबडे, सृजन फाउंडेशनच्या शालिनी हेडाऊ, SRPF चे सुमीत राठोड, पर्यावरण संरक्षण गतिविधीचे डॉ. पोहरकर, अग्निसुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ राजेश सबनीस, कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. योगिता चरडे तसेच NSS प्रमुख श्रुतिका भुरसे यांचे मार्गदर्शन लाभले.

daval 
 
 
शिबिराच्या पहिल्या दिवशी व्यसनमुक्तीवर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. त्यानंतरच्या दिवसांत वृक्षारोपण, संगणक जनजागृती, अग्निसुरक्षा जनजागृती, स्वच्छता अभियान, योग प्रशिक्षण, प्रदूषण जनजागृती तसेच युवकांसाठी साक्षरता जनजागृती अभियान असे विविध उपक्रम राबविण्यात आले. Shree Sainath Collegeबी. फार्मसी तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने व समर्पणभावनेने सक्रिय सहभाग नोंदविला. या NSS शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव व सेवाभाव अधिक दृढ झाल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.
सौजन्य :शेफाली दुधबडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0