पोलिस विभागात अधिकार्‍यांची खांदे पालट

25 Dec 2025 09:31:30
वर्धा,
wardha police department पोलिस विभागात गेल्या दोन-तीन दिवसात मोठी उलथापालथ झाली आहे. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या नागपूर बदलीनंतर सोमवार २२ रोजी रात्री १० पोलिस अधिकार्‍यांची खांदेपालट करण्यात आली आहे. काहींना नवीन पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली तर काहींना मुख्य विभागांमध्ये नियुती देण्यात आली आहे.
 
 
 
अनुराग जैन
 
पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांना पुन्हा एकदा सेलू पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सेलूच्या ठाणेदार मनोज गभने यांची आर्थिक गुन्हे शाखेत नियुती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक अनिल मेश्राम यांना वर्धा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत कदम यांना दहेगाव पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारंजा घाडगे पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांना सेवाग्राम पोलिस ठाणे तर कारंजाचे पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर यांना जिल्हा विशेष शाखा, सेवाग्रामचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांना नियंत्रण कक्ष आणि सायबर पोलिस स्टेशन, जिल्हा विशेष शाखेचे एपीआय आशिषसिंह ठाकूर यांना स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखेचे एपीआय निशांत फुलेकर यांना एलसीबीच्या एनडीपीएस विभाग, कारंजा येथे एमडी मादक पदार्थ बनवण्याचा कारखाना सापडल्यामुळे जिल्ह्यातील पोलिस विभागात एकच खळबळ उडाली होती.wardha police department याच कारणामुळे कारंजाचे ठाणेदार महेश भोरटेकर आणि इतर काही कर्मचार्‍यांना मुख्यालयात अटॅच केले केले होते.
पोलिस अधीक्षकांच्या बदली आदेशानंतर दहा पोलिस अधिकार्‍यांची नियुती करण्यात आली आहे. यामध्ये महेश भोरटेकर यांना जिल्हा विशेष शाखेतील जबाबदारी देण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0