नागपूर,
vande-bharat-express : नागपूर-पुणे मार्गावरील सर्वांत वेगवान वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा कमी वेळेत आणि आणखी सुपरफास्ट होईल. पुणे ते अजनी नागपूर वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक २०६१०१ च्या वेळापत्रकात २६ डिसेंबर पासून बदल करण्यात आला असून आता ही ट्रेन आणखी जलद गतीने तिच्या गंतव्यस्थानावर पोहोचेल.
राजधानी पेक्षाही वंदे भारतची क्रेझ
भारतीय रेल्वेच्या इतिहासात राजधानी, शताब्दीनंतर आता वंदे भारत ट्रेन सर्वाधिक लोकप्रिय आहे. राजधानी ट्रेनपेक्षाही वंदे भारत एक्स्प्रेसची क्रेझ प्रवाशांमध्ये सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरात सुमारे १६० सेवा वंदे भारत धावत आहे. यातील बहुतांश ट्रेनना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असून, अनेक ट्रेनचे कोच ८ वरून १६ ते २० करण्यात आले आहेत.
प्रतिसादामुळे वेळापत्रक बदल
गत ६ वर्षांच्या कालावधी तब्बल ७ कोटीहून प्रवाशांनी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद लुटला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, ही गाडी अकोला आणि बडनेरा रेल्वे स्थानकांवर अंदाजे १० मिनिटे आधी पोहोचेल आणि या स्थानकांवरून १० मिनिटे आधी सुटेल. शिवाय, ती वर्धा स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा लवकर पोहोचेल. या ट्रेनला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे रेल्वेने वेळापत्रक बदल केला आहे. प्रवाशांच्या रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी पुणे ते नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसचे नवीन वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असा सल्ला प्रवाशांना देण्यात आला आहे.
सर्वात लांब अंतराची वंदे भारत ठरली
पुणे नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस ही ट्रेन पुण्याहून सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी सुटते. तर अजनी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी सुटते. पुण्याहून गुरुवारी, तर नागपूरहून सोमवारी ही ट्रेन सेवा देत नाही.
नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त पुण्यात राज्य आणि राज्याबाहेरील लाखो नागरिक वास्तव्यास आहेत, ज्यात विदर्भातील लोकांची संख्या जास्त आहे. पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सध्या भारतातील सर्वात लांब अंतराची वंदे भारत एक्स्प्रेस ठरली आहे. ट्रेन एकूण ८८१ किमी अंतर सुमारे १२ तासांत पूर्ण करते.