25 वर्षानंतर ‘कमळ’ फुलले

25 Dec 2025 19:30:53
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
lakshmi-mehta : नुकतीच नगर परिषद निवडणूक पार पडली आणि अनपेक्षित निकाल जाहीर झाला. भाजपाने आपले खाते उघडले याची चांगलीच चर्चा आहे. गेल्या 25 वर्षानंतर ‘कमळ’ फुलल्याचा आनंद व जल्लोेष भाजपाकडून बुधवार, 24 डिसेंबरला करण्यात आला.
 
 
y25Dec-Digras
 
 
येथे महायुतीतील मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेने भाजपाला वाळीत टाकले. ऐन नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच्या दोन तासांपूर्वी युतीची घडी मोडली. 12 प्रभागात शिवसेनेने आपल्या 25 उमेदवारांना निवडणुक रिंगणात उतरवून आपल्या घटक पक्षाबरोबर लढाई केली. या लढाईत शिवसेनेची जी हानी झाली ती पुढील पाच वर्षांत भरून न निघणारी अशीच आहे.
 
 
भाजपाची एकही जागा निवडून येवूच शकत नाही. यावर शर्यत लावणारे अनेक हारलेत. बहूल मागासवर्गीय परिसरातील प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपाच्या लक्ष्मी रिखबचंद मेहता निवडून आल्या आणि 25 वर्षानंतर इतिहास रचल्या गेला. पालकमंत्री व खासदारांच्या तगड्या उमेदवारात भाजपाने आपले खाते उघडले याचीच चर्चा आहे. लक्ष्मी मेहता यांच्या आधी स्नेहलता चिद्दरवार यांना भाजपाच्या पहिल्या नगरसेवक म्हणून मान मिळाला होता. त्यानंतर आता लक्ष्मी मेहता या दुसèया मानकरी ठरल्या आहेत. माजी नप अध्यक्ष सदफजहा मो.जावेद यांचा पराभव करुन प्रभाग क्रमांक 5 मधून त्यांनी 681 मते घेऊन विजयी मिळवला. 25 वर्षानंतर आपले अस्तित्व निर्माण झाल्याने भाजपा शहरकडून जल्लोष करण्यात आला. तर अनेकांनी नवनिर्वाचित नगरसेवक लक्ष्मी मेहता यांचा सत्कार केला.
Powered By Sangraha 9.0