पांढरकवडा शहरात नेत्यांना ‘थोडी खुशी, थोडा गम’

25 Dec 2025 19:49:49
सुबोध काळपांडे
पांढरकवडा,
pandharkawada-municipal-council : नगर परिषद पांढरकवड्यात आपली पूर्ण सत्ता येईल या आशेवर असलेल्या शिवसेना पक्षासाठी ‘गड आला पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली. तर भाजपाने पहिल्यांदा नप अध्यक्षपदाला गवसणी घातल्याने कार्यकर्त्यात मोठा आनंद निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमदार राजू तोडसाम, भाजपा तालुका अध्यक्ष आनंद वैद्य आणि खेतानी फाऊंडेशन आणि शिवसेना नेते सलीम खेतानी यांचे निवासस्थान असल्याने हा प्रभाग प्रतिष्ठेचा बनला होता. या प्रभागात भाजपाने दोन्ही नगरसेवक विजयी झाले तर अध्यक्षांना तब्बल 225 मतांची आघाडी मिळाली. प्रभाग 8 बची निवडणुकीत शिवसेना शहराध्यक्ष आतिश चव्हाण व भाजपा शहराध्यक्ष गजानन जुआरे यांच्या लढतीत आतिश चव्हाण विजयी झाले. 8 अ मध्ये भाजपाच्या रेखा चितारलेवार यांनी बाजी मारली. शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहत असलेल्या प्रभाग 6 मध्ये भाजपा आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. परंतु तेथे डॉ. अभिनय नहाते यांना 387 तर बोरेले यांना तब्बल 612 मते मिळाली.
 
 
 
 
np
 
 
 
काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार अ‍ॅड. विनोद तिवारी यांना प्रभाग 9 मध्ये फक्त230 मते मिळाली. डॉ. नहाते यांना 316 तर आतिश बोरेले यांना 524 मते मिळाली. प्रभाग 10 मध्ये बोरेले यांना 884 मते मिळाली. तर डॉ. नहाते यांना 322 मते मिळाली. ही निवडणुक अर्थपूर्ण झाली असली तरी भाजपातर्फे प्रभाग 6 अ मधील रुपेश कुटकलवार हा अत्यंत गरीब घरचा युवक निवडून आला. तो रोजंदारी सफाई कर्मचारी आहे. त्याचा विजयसुद्धा अनेकांना सुखावणारा ठरला.
 
 
मागील नगरसेवकांपैकी शिवसेनेचे योगेश कर्णेवार 5 अ मधून तर काझी सरफरजुद्दीन एनुद्दीन यांनी 11 ब मधून विजय प्राप्त केला. तर 2013 मधील विजयी नगरसेवक अनिल बोरले हे भाजपाकडून यावेळी विजयी होऊन पुन्हा नगरसेवक बनले. सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांच्या पोलखोल सभांनी मोठी गर्दी खेचली होती. त्यांनी भाजपाच्या बाजूने आपली ताकद पणाला लावली. तर 16 नगरसेवक विजयी होऊनही पांढरकवडा सोबत घाटंजीमध्ये अपयश आल्याने खेतानी फाऊंडेशनची अवस्था थोडी खुशी जादा गम अशी झाली.
 
 
नप अध्यक्ष पद भाजपाने पटकावले तरी नगरसेवक शिवसेनेचे जास्त असल्याने येणाèया दिवसात कारभार कसा चालेल हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. परंतु मागील 3 वर्षात नगर परिषदेत झालेला भोंगळ कारभार संपून ‘नवा गडी नवा राजबने नपचे हरवलेले वैभव पुन्हा प्राप्त करून द्यावे इतकीच नागरिकांची इच्छा आहे.
Powered By Sangraha 9.0