ठाण्यातील शासकीय आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

26 Dec 2025 09:36:45
ठाणे,
student committed suicide महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावातील एका शासकीय आश्रमशाळेत इयत्ता दहावीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर विद्यार्थिनी तिच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शाळेतील कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनी खोलीत लटकलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
 
 

student committed suicide 
 
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थिनीने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व शक्य त्या बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, अलीकडेच काही पालकांनी शाळेतील अतिशय कडक शिस्तीबाबत तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवरही पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांकडून गुन्हा दाखल
काही दिवसांपूर्वीच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या आश्रमशाळेला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी शाळेतील अपुऱ्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली होती.student committed suicide मुरबाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0