तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
sanjay-deshmukh : या देशातील कृषी विद्यापीठे चुकीच्या खतांची शिफारस करतात, असे खासदार संजय देशमुख यांच्या प्रश्नाला देण्यात आलेल्या अधिकृत उत्तरावरून उघड झाले आहे. यवतमाळ, वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी 8 ऑगस्ट रोजी लोकसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सरकारने दिलेल्या उत्तरात, उच्च मीठ सूचकांक असलेली खते मातीतील क्षारता वाढवून मुळांना इजा करतात, तसेच पानांवर जळजळ निर्माण करतात, असे मान्य केले आहे.
सरकारच्या उत्तरानुसार, कॅल्शियम कार्बोनेट समतुल्य मातीचा पीएच बदलतो. काही खते माती आम्लीय करतात तर काही आम्लता कमी करतात. त्यामुळे मातीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता व सूक्ष्मजीव क्रिया बाधित होते. दरम्यान, केंद्रीय रसायने व खते मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी 23 ऑगस्ट रोजी दिलेल्या पत्रात खतांच्या पिशव्यांवर मीठ सूचकांक व ‘कॅल्शियम कार्बोनेट समतुल्य’ नमूद करणेबाबत विचार निर्देश दिले आहेत. या संदर्भात सध्या संबंधित विभागाकडून तपास सुरू असल्याची माहिती आहे.
खतांच्या असंतुलित वापरामुळे राज्यासह देशातील शेतीमातीचा èहास वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर, बहुतेक खतांचा मीठ सूचकांक व सर्व खतांचा कॅल्शियम कार्बोनेट उपलब्ध नसल्याचे गंभीर वास्तव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने 12 डिसेंबर रोजी शेतकरी संघटना विज्ञान व तंत्रज्ञान आघाडी प्रमुख मिलींद दामले यांना पाठवलेल्या पत्रात उघड झाले आहे. शेतकèयांना रासायनिक खतांचा मीठ सूचकांक व ‘कॅल्शियम कार्बोनेट समतुल्य’ माहीत नसताना शिफारस अवैज्ञानिक असल्याचा शेतकरी संघटनेने म्हटले आहे.
तज्ञांच्या मते, खतांच्या पॅकिंगवर मीठ सूचकांक व कॅल्शियम कार्बोनेट समतुल्य माहिती अनिवार्य केल्याशिवाय शाश्वत शेती शक्य नाही. अन्यथा भविष्यात मातीचे अपघटन अधिक तीव्र होण्याचा इशारा शेतकरी संघटना विज्ञान व तंत्रज्ञान आघाडी प्रमुख दामले यांनी दिला आहे.