आंबेनळी घाटात भीषण अपघात... कार शंभर फूट दरीत कोसळली

26 Dec 2025 11:49:17
सातारा,
Ambanli Ghat acciden किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी निघालेल्या अमरावती येथील पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात आंबेनळी घाटात झाला. घाटातील वळणदार रस्ता आणि तीव्र उताराच्या ठिकाणी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट सुमारे शंभर फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना अधिक उपचारासाठी साताऱ्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 

Ambanli Ghat acciden  
अमरावती Ambanli Ghat acciden  येथील पर्यटक देवदर्शनासाठी बाहेर पडले होते. कोल्हापूरमार्गे महाबळेश्वर परिसरातील किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी जात असताना आंबेनळी घाटात हा अपघात घडला. घाटातील अरुंद रस्ता, तीव्र उतार आणि वळणांमुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.अपघाताची माहिती मिळताच प्रतापगड मदत पथक आणि महाबळेश्वर मदत पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खोल दरी, घनदाट जंगल आणि अवघड भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत होते. मात्र दोरखंड, सुरक्षासाधने आणि आवश्यक उपकरणांच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात आले. सुमारे शंभर फूट खोल दरीत उतरून जखमींना बाहेर काढण्यात आले.
 
 
 

बचाव कार्य सुरू
या अपघातात निखिल Ambanli Ghat acciden  शशिकांत पांढरीकर आणि शशिकांत माधवराव पांढरीकर (रा. हरिभाऊ कॉलनी, नगर, अमरावती) हे गंभीर जखमी झाले आहेत. पल्लवी अभिजीत काशीकर, यक्षित अभिजीत काशीकर आणि शरयू शशिकांत पांढरीकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे.घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती लक्षात घेता पोलीस वाहतूक नियंत्रणात ठेवण्याचे काम करत होते. अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्यासह पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.या बचाव कार्यात महाबळेश्वर मदत पथकाचे सुनील भाटिया, ऋषिकेश जाधव, आशिष बिरामणे, अमित कोळी, अनिकेत वाघदरे, सुचित कोळी, संकेत सावंत, ओंकार शेलार, आदित्य बावळेकर, साई हवलदार, दीपक ओंबळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.महाबळेश्वर परिसरातील आंबेनळी घाटात यापूर्वीही वारंवार अपघातांच्या घटना घडल्या आहेत. या अपघातामुळे घाटातील रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रवाशांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0