आर्वी,
Arvi political news येथील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले असून भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहे. विधान परिषद आमदार दादाराव केचे यांना काल गुरुवारी २६ रोजी रात्री भाजपा महिला कार्यकर्त्यांनी भरचौकात अडवून विचारलेला जाब आणि त्यानंतर आज आमदारांच्या समर्थनासाठी निघालेला मोर्चा यावरून येथे संभ्रमाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, भाजप आमदाराच्या समर्थनात निघालेल्या मोर्चात चक्क काँग्रेस आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते दिसल्याने मोर्चा नेमका कोणासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात एक नाट्यमय घडामोड घडली. भाजपा महिला कार्यकर्त्यांनी आ. केचे यांचे वाहन अडवून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. निवडणूक काळात तुम्ही भाजपाच्या अधिकृत महिला उमेदवारांच्या विरोधात प्रचार का केला? तुम्ही आपल्याच कार्यकर्त्यांच्या प्रभागात ‘तुतारी’ आणि ‘पंजा’ला मतदान करा, असे आवाहन का केले? असा सवाल त्या महिलांनी केला.
या घटनेचा Arvi political news निषेध म्हणून आज शुक्रवारी २६ रोजी आर्वी बंदचे आवाहन करण्यात आले होेते. भाजपाचे राजकीय शत्रू म्हणून ओळखले जाणारे तुतारी आणि पंजा समर्थक कार्यकर्ते या मोर्चाचे नेतृत्व करताना दिसले. ज्यांनी नेहमीच भाजपच्या ध्येयधोरणांना विरोध केला, तेच आज आमदारांच्या बचावासाठी रस्त्यावर उतरल्याने आश्चर्य व्यत करण्यात येत आहे.
नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचा वचपा काढण्यासाठी विरोधकांनी या मोर्चाचा आधार घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. या मोर्चाला आर्वीतील व्यापारी आणि नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.