दार उघडणार, नशिबाचा 'गेम' पालटणार!

26 Dec 2025 13:11:02
मुंबई
Bigg Boss Marathi 6 लोकप्रिय रियालिटी शो ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सिझनसाठी निर्मात्यांनी दमदार प्रोमो रिलीज केला आहे. “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” अशा थीमसह रितेश भाऊ प्रेक्षकांसमोर घराची आणि गेमची झलक आणत आहेत. या प्रोमोने संपूर्ण महाराष्ट्रात चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
 

 Bigg Boss Marathi 6 
प्रोमोमध्ये रितेश भाऊंचे कडक संवाद आणि हटके लूक पाहायला मिळतो. “फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत… आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत…” अशा शब्दांत त्यांनी या सिझनचा मूड सेट केला आहे. प्रोमोमध्ये घराची भव्य रचना आणि शेकडो दारखिडक्यांनी सजलेले घर दाखवले असून, प्रत्येक दारामागील सरप्राइझ सदस्यांचे नशिब बदलणारे ठरू शकते, असा इशारा दिला आहे.या सीझनमध्ये खेळ फक्त मनोरंजनापुरता मर्यादित न राहता सदस्यांचे नशिब बदलणारा असेल, असा इशारा प्रोमोमधून दिला जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांना घरातील प्रत्येक क्षण उत्सुकतेने पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर रितेश भाऊंचा हा प्रोमो जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांच्या उत्सुकतेत भर घालत आहे.‘बिग बॉस मराठी सिझन ६’ ११ जानेवारीपासून कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Powered By Sangraha 9.0