अटल विचारांचा जागर..! भाजपातर्फे घाटंजीत अटलबिहारी वाजपेयी जयंती उत्साहात

26 Dec 2025 19:57:34
तभा वृत्तसेवा
घाटंजी, 
atal-bihari-vajpayee-jayanti : भारतीय जनता पार्टीचे प्रवर्तक, भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त घाटंजीच्या वतीने शहरातील सोनू मंगलम्मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष विजय बैस, शहर कार्याध्यक्ष प्रभाकर चटूले, माजी शहराध्यक्ष राम खांडरे, अमित पडलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्व. अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
 
 
y26Dec-Ghatanji
 
 
 
यावेळी प्रा. भगवान डोहाळे व प्रभाकर कानतोडे यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून अटलजींच्या जीवनकार्याचा व राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. राष्ट्रनिष्ठा, दूरदृष्टी, लोकशाहीवरील अढळ विश्वास आणि सर्वसमावेशक राजकारण हीच अटलजींची खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
या प्रसंगी महेश जाधव, महिला शहराध्यक्ष साधना माडूरवार, लता ठाकरे, सुषमा खांडारे, नगरसेवक भारती कुंटलवार, आशा गिरी, सोनल ठाकरे, किरण प्रधान, विश्वास राऊत, रवी भोजवार, गोपाल काळे, शुभम उदार, प्रमोद गिरी, अंकुश ठाकरे, कादिर शेख, रोशन वातीले, ईशांत गुप्ते, संजय ढगले, राजू महल्ले, सुरेश ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0