नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अवशेष भारतात आणण्याची मागणी

26 Dec 2025 11:16:23
नवी दिल्ली, 
netaji-subhas-chandra-bose नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून नेताजींचे अवशेष भारतात परत करण्याची विनंती केली आहे. त्यांनी लिहिले आहे की नेताजींचे अवशेष जपानमधील रेनकोजी मंदिरात ठेवण्यात आले आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक वेळा सरकारला ते भारतात परत आणण्याचे आवाहन केले आहे. नेताजींचे अवशेष भारतात आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नसले तरी, चंद्र कुमार बोस यांना आता आशा आहे की राष्ट्रपती मुर्मू तसे करतील.
 
netaji-subhas-chandra-bose
 
चंद्र कुमार बोस यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे, “महोदय, शरतचंद्र बोस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्य या नात्याने मी आपल्याला हे पत्र लिहीत आहे. भारताच्या आजच्या आणि भावी पिढ्यांसाठी नेताजींची वारसा अधिक स्मरणीय व्हावा, यासाठी एक प्रस्ताव आपल्यासमोर मांडू इच्छितो. आपल्याला माहीतच आहे की २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये नेताजींनी स्थापन केलेल्या आझाद हिंदच्या तात्पुरत्या सरकारच्या स्थापनेला आठ दशके पूर्ण झाल्याचा सोहळा साजरा करण्यात आला. मला समजले आहे की ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध शेवटपर्यंत लढा देणाऱ्या सैनिकांना सन्मान देण्यासाठी आणि नेताजींच्या ‘चलो दिल्ली’ या ऐतिहासिक घोषणेची आठवण जपण्यासाठी दिल्लीत योग्य ठिकाणी इंडियन नॅशनल आर्मी (INA)चे स्मारक उभारण्याची योजना आहे. netaji-subhas-chandra-bose तसेच, नेताजींचे पार्थिव अवशेष आजही जपानमधील टोकियो येथील रेनकोजी मंदिरात ठेवले असल्याची माहिती आपल्याला आहेच. गेल्या अनेक दशकांपासून INA चे माजी सैनिक, नेताजींची कन्या प्रा. अनिता बोस-फाफ तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी भारत सरकारकडे नेताजींचे अवशेष त्यांच्या मातृभूमीत परत आणण्याची मागणी वारंवार केली आहे. या विषयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, अशी आम्ही आपल्याला विनंती करतो.”
चंद्र कुमार बोस हे ‘द ओपन प्लॅटफॉर्म फॉर नेताजी’चे संयोजक आहेत. netaji-subhas-chandra-bose ते सामाजिक-राजकीय भाष्यकार आणि कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. त्यांचे वडील आरामबाग मतदारसंघातून खासदार होते, त्यामुळे त्यांचा राजकारणाशी जुना संबंध आहे. चंद्र कुमार यांनी लंडनमधील हेंड्रिक्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतल्यानंतर कोलकाता आयआयएममधून उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी टाटा समूहात सुमारे १८ वर्षे काम केले आणि त्यानंतर स्वतःची आयटी व कन्सल्टन्सी कंपनी सुरू केली. २०१६ मध्ये ते भाजपमध्ये सहभागी झाले होते. २०१६ मध्ये भवानीपूर आणि २०१९ मध्ये कोलकाता दक्षिण लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली, मात्र दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला. अखेर २०२३ मध्ये वैचारिक मतभेदांचे कारण देत त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
Powered By Sangraha 9.0