डॉ. पंजाबराव देशमुख जन्मोत्सव उत्साहात

26 Dec 2025 15:59:11
नागपूर,
Dr. Punjabrao Deshmukh डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जन्मोत्सव काँग्रेस नगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये २२ डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.या जन्मोत्सवाचे उद्घाटन २२ डिसेंबर रोजी करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी संस्थेचे आजीवन सदस्य डॉ. बबन चौधरी, धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे, शिवाजी सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 
80
 
 
 
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मोत्सवानिमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक जाणीव जपणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण व्हावे या उद्देशाने रक्तदान शिबिर तसेच दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले Dr. Punjabrao Deshmukh.हे सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. मेघे, डॉ. चोपडे, डॉ. गोसावी, डॉ. आस्कर, डॉ. निलेश म्हात्रे, डॉ. राजेश तिमाने यांनी मोलाची भूमिका बजावली.या जन्मोत्सवाच्या माध्यमातून डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सौजन्य: डॉ.प्रणाली म्हात्रे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0