मुलांनो, आईवडील आणि भारतमातेला कधीही विसरू नका : कांचन गडकरी

26 Dec 2025 20:02:25
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
kanchan-gadkari : आपल्याला जन्म देणारे आई-वडील, आपल्यावर संस्कार करणारे गुरुजन, विवेकानंद छात्रावासासारख्या पवित्र वास्तुत आपल्यावर शिक्षण, स्वास्थ्य, स्वावलंबन इत्यादीच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी झटणारी सर्व वडीलधारी मंडळी यांचे आपल्यावर अनंत उपकार असतात. त्यांची परतफेड म्हणजे आई-वडिलांची उत्तरायुष्यात काळजी घेणे आणि समाजसेवेद्वारे भारतमातेची पूजा करणे होय. तुम्ही शिकून खूप मोठे व्हा परंतु आई-वडील आणि भारतमातेला कदापी विसरू नका, असा संदेश संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष कांचन गडकरी यांनी मुलांना दिला.
 
 
 
y26Dec-Deendayal
 
 
 
दीनदयाल सेवा प्रतिष्ठान संचालित विवेकानंद छात्रावासाच्या पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या. रेमंड युको डेनिमचे संचालक वर्क्स नितीन श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष ज्योती चव्हाण, डॉ. मनोज पांडे, सचिव विजय कद्रे, विवेकानंद छात्रावासाचे अध्यक्ष प्रवीण किडे, सचिव मधुरा वेळूकर प्रामुख्याने उपस्थित होते. भारतमाता, दीनदयालजी व विवेकानंदांच्या प्रतिमांना पुष्पार्चन व दीप प्रज्ज्वलनाने प्रारंभ झालेल्या या मेळाव्यात सुरुवातीला छात्रावासातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये विविध नृत्य सादरीकरण, राष्ट्रभक्तीपर गीत, संस्कृत कथा, योगासन सादरीकरण, पोवाडा इत्यादी कार्यक्रमांचा समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमांचे संचालन छात्रावासातीलच तेजस बारेकर व हिमांशु उइके या विद्यार्थ्यांनी केले.
 
 
याप्रसंगी वंदना पोटे व प्रतीक्षा पवार या पालकांनी मनोगतातून मुलांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकात समितीच्या सचिव मधुरा वेळूकर यांनी सत्तावीस वर्षांतील छात्रावासाच्या उंचावत गेलेल्या आलेखाचा आढावा घेतला. छात्रावासाकरिता वर्षभर धान्य पुरवणाèया शेतकèयांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विवेकानंद छात्रावासाचे हितचिंतक असणारे, यवतमाळ नगर परिषदेत नुकतेच निवडून आलेले नगरसेवक दत्ता कुळकर्णी, माया शेरे, कीर्ती राऊत, शैला मिर्झापुरे, बिपिन चौधरी, सोनाली मडावी, नितीन गिरी, सुनील काळे यांचाही गौरव करण्यात आला.
 
 
छात्रावासाच्या संचालनात व कार्यक्रमात मदत करणारे धनश्री ठाकरे, रश्मी परशराम आणि श्रुती राठोड यांचाही सन्मान करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाèया विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन श्रीवास्तव यांनी छात्रावासातील मुलं व त्यांच्यावर संस्कार करणाèया सर्वांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन, परिचय व स्वागत कीर्ती चेटुले, मंजुषा दुधाट, शीतल राठोड व छाया पारवेकर यांनी केले. प्रवीण किडे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे, जिल्हा संघचालक विलास देशमुख, नगर संघचालक धनंजय पाचघरे, विभाग कार्यवाह अंकुश रामगडे, जिल्हा कार्यवाह महेश धनरे, अजय मुंधडा, डॉ. प्रशांत गावंडे, मंगेश देशपांडे यांच्यासह यवतमाळातील विविध क्षेत्रातील गणमान्य नागरिक व बेड्यावरील पालक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0