नागपूर,
Manoj Vaidya तरुण भारतच्या शतकी महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित होत असलेल्या विविध विशेष पुरवण्यांना वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यापैकी साहित्य व संस्कृती पुरवणी विशेष लोकप्रिय ठरत असून, या पुरवणीत प्रसिद्ध होणाऱ्या ‘मन्याच्या काड्या’ या सदरातील विनोदी कथांनी वाचकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.धंतोली परिसरातील अभ्यंकर स्मारक ट्रस्ट येथे कार्यरत ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने ‘मन्याच्या काड्या’ सदराचे लेखक मनोज वैद्य यांच्या निवडक विनोदी कथांचे अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. विशेष म्हणजे, स्वतः लेखक मनोज वैद्य यांनी आपल्या विनोदी शैलीत या कथांचे अभिवाचन केले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सचिव मंगला लोहिया यांनी दैनंदिन जीवनात विनोदाचे महत्त्व अधोरेखित केले. वऱ्हाडी भाषेतील विनोद थेट मनाला भिडतात व मन प्रसन्न करतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा विनोदी कथांचे क्षणिक हास्यही अत्यंत समाधान देणारे असते, असे त्यांनी नमूद केले. Manoj Vaidya यावेळी अध्यक्ष यशवंत खरे यांनी पुष्पगुच्छ देऊन लेखक मनोज वैद्य यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला सचिव मंगला लोहिया, उपाध्यक्ष अर्चना धोडपकर, सहसचिव दुलीचंद खडगी, सुरेश जोगळेकर, लक्ष्मीकांत कोठारी, प्रशांत अत्रे, सुनीला जोगळेकर, शालिनी पेंडसे, मोहन खरे, सुजाता वैद्य, शोभा कदम, संस्कार भारती साहित्य विधा प्रमुख प्रसाद पोफळी, मंगेश धर्माधिकारी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य :गजेंद्र डोळके ,संपर्क मित्र