लंडनमध्ये असलेल्या मौलानापर्यंत कायद्याची पोहोच; ईडीने केला गुन्हा दाखल

26 Dec 2025 13:06:10
नवी दिल्ली, 
maulana-shamsul-huda-khan कायद्याचा हात किती दूरपर्यंत पोहोचतो, याचे उदाहरण म्हणजे भारताच्या प्रवर्तन निदेशालयाने (ED) लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मौलाना शम्सुल हुदा खान याच्याविरोधात केलेली कारवाई. मनी लॉन्डरिंगसह अनेक गंभीर आरोपांप्रकरणी ईडीने शम्सुल हुदा खान यांच्यावर गुन्हा दाखल करत तपासाला गती दिली आहे. लंडनमध्ये राहणारा शम्सुल हुदा खान हा इस्लामिक प्रचारक असून उत्तर प्रदेश एटीएसने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
 
maulana-shamsul-huda-khan
 
शम्सुल हुदा खानची १९८४ मध्ये एका सरकारी अनुदानित मदरशामध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. तपासात असे समोर आले आहे की, २०१३ मध्ये ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतरही तो २०१७ पर्यंत भारतातून वेतन घेत होता. त्या काळात तो ना भारतात वास्तव्यास होता, ना अध्यापनाचे कोणतेही काम करत होता. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, गेल्या सुमारे २० वर्षांत त्याने अनेक परदेश दौरे केले असून भारतात उघडलेल्या ७ ते ८ बँक खात्यांद्वारे त्याला कोट्यवधी रुपयांची रक्कम मिळाल्याचे आढळले आहे. इतकेच नव्हे तर, शम्सुल हुदा खानच्या नावावर १२ हून अधिक स्थावर मालमत्ता असल्याचा आरोप असून, त्यांची एकूण किंमत ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, धार्मिक शिक्षणाच्या आडून कट्टर विचारसरणीला चालना देणे आणि बेकायदेशीर निधी उभारणी करणे, असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. उत्तर प्रदेशातील आझमगढचा रहिवासी असलेल्या शम्सुल हुदा खानने आपल्या ‘रजा फाउंडेशन’ या एनजीओच्या माध्यमातून तसेच वैयक्तिक खात्यांमधून अनेक मदरशांना निधी पुरवला असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानी आझमगढ आणि संत कबीर नगर येथे दोन मदरसे स्थापन केले होते, मात्र नंतर त्यांची मान्यता रद्द करण्यात आली. maulana-shamsul-huda-khan आता तपास यंत्रणा त्यांच्या परदेशी संपर्कांचीही सखोल चौकशी करत आहेत. विशेषतः युनायटेड किंगडममधील काही कट्टरपंथी संघटनांशी त्यांचे संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शम्सुल हुदा खानचे पाकिस्तानशीही संबंध असल्याचे संकेत मिळाले आहेत. maulana-shamsul-huda-khan त्याच्या पाकिस्तान दौऱ्यांचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले असून, पाकिस्तानातील काही अतिरेकी संघटनांशी असलेल्या संपर्कांचा तपास सुरू आहे. तो पाकिस्तानातील कट्टरपंथी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’शी संबंधित असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. सध्या ईडी शम्सुल हुदा खानच्या निधी नेटवर्क, परदेशी दुवे आणि संपत्तींची सखोल चौकशी करत असून, तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे एजन्सीने स्पष्ट केले आहे.
Powered By Sangraha 9.0