गडचिरोली,
pranoti nimborkar गडचिरोली नगरपरिषदेतून प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष ऍड. प्रणोती निंबोरकर यांनी विजयाचा उत्साह न दवडता शहराच्या विकासाची धुरा तत्काळ हातात घेतली आहे. निवडून आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
निंबोरकर यांनी गडचिरोली शहरासाठी रिंग रोडची तातडीची गरज मुख्यत्वे अधोरेखित केली. सतत वाढत असलेली वाहतूक आणि शहरातील अरुंद रस्त्यांमुळे निर्माण होणारा ताण लक्षात घेता गडचिरोलीसाठी रिंग रोड आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाची तातडीने मंजुरी देऊन पुढील पावले उचलावीत, अशी ठाम मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली.
रिंग रोड व्यतिरिक्त शहरातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, निधी उपलब्धता, तसेच नागरिकांच्या रोजच्या समस्या या विषयांवरही निंबोरकर यांनी चर्चा केली. गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक ते सर्व पाठबळ देण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. “भारतीय जनता पक्षाच्या वतीने गडचिरोली शहराचा विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत,” अशी ग्वाही निंबोरकर यांनी या वेळी मुख्यमंत्र्यांना दिली. विजयानंतर मुख्यमंत्र्यांकडून आशीर्वाद घेत शहराच्या विकासयात्रेची पहिली पायरी टाकल्याने पक्षांतर्गत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.pranoti nimborkar भेटीच्या वेळी गडचिरोली प्रभारी तथा आमदार कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. देवराव होळी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महामंत्री गोविंद सारडा, युवा नेते सागर निंबोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. गडचिरोलीतील विकासकामांसाठी राजकीय पातळीवर झालेल्या या पहिल्या पुढाकाराकडे स्थानिकांनी आशेने पाहिले असून, आगामी काळात शहराच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे