तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
mp-broke-a-political-record : यवतमाळ नगर परिषदेत ‘58 पैकी शून्य’चा राजकीय विक्रम खासदार संजय देशमुख यांच्या भूमिकेमुळे ऐतिहासिक पराभव झाला आहे. त्यामुळे शनिवारी, 29 डिसेंबर रोजी त्यांचा भव्य सत्कार सभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संतोष ढवळे यांनी पत्रपरिषदेत दिली.
पुढे बोलताना संतोष ढवळे म्हणाले, यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत तब्बल 58 जागांपैकी एकाही जागेवर उमेदवार निवडून न येण्याचा अभूतपूर्व व लाजिरवाणा विक्रम घडला असून, या राजकीय अपयशास थेट यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुखच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला.
वक्त्यांनी खा. संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात टीकास्त्र सोडले. ‘नप निवडणुकीत स्वतःच्या पक्षाचा अंडाही फुटू नये, यासाठी खा. देशमुख यांनी जाणीवपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाल्यामुळेच ‘58 पैकी शून्य’ हा विक्रम साकार झाल्याचा’ उपरोधिक टोला उपस्थितांनी लगावला.
या ऐतिहासिक पराभवाबद्दल खा. देशमुख यांचा शनिवार, 27 डिसेंबर रोजी उत्सव मंगल कार्यालय, यवतमाळ येथे सत्कार करण्याचा प्रस्ताव पत्रपरिषदेत मांडला. खा. संजय देशमुख यांनी स्वतः शिवसेनेची समिती स्थापन केली होती. या समितीत जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि यवतमाळ विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांचा समावेश होता. या समितीच्या काँग्रेससोबत बैठका झाल्या असून, शेवटच्या बैठकीत खा. देशमुख यांनीच काँग्रेससोबत युतीचा निर्णय झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पत्रपरिषद घेण्याचे आदेशही देण्यात आले.
या पत्रपरिषदेत आमदार बाळासाहेब मांगुळकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शप गट) जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, विधानसभा प्रमुख संतोष ढवळे, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मात्र, युतीनंतर जागावाटप सुरू असतानाच खा. देशमुख व त्यांच्या सहकाèयांनी कोणतीही अधिकृत माहिती न देता युती तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, युतीबाबत पत्रकार परिषद घेण्यास सांगितलेल्या पदाधिकाèयांनाच युती तुटल्याची माहिती देण्यात आली नाही. ही बाब पक्षाबाहेरील लोकांकडून समजल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.
या पत्रपरिषदेला संतोष ढवळे, मंदा गाडेकर, किशोर वानखेडे, राजू नागरगोजे, दिनेश इंगळे, अजय कोल्हे, संगीता राऊत, अॅड. विनोद आस्कर, आशिष सावंतकर, विजय आडे, रवी राऊत, उमेश गावंडे, रवी नागरगोजे, अवधूत पवारसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.