मंगरूळनाथ
Nagi burglary news, तालुयातील नागी (इचा) येथे २४ डिसेंबरच्या रात्री तीन ठिकाणी धाडसी घरफोडीच्या घटना घडल्या. अज्ञात चोरट्यांनी घरांच्या दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून ९ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना चोरट्यांनी मोहन रामदास राऊत यांच्या घरात शिताफीने प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर फोडले. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षीरसागर, ठाणेदार किशोर शेळके , श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट दिली त्यातील ९० ग्रॅम सोन्याचे दागिने (४ लाख ५० हजार) व ३० हजार रुपये रोख असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्याच रात्री राजेश अमृतराव राऊत यांच्या घरातून ५६ ग्रॅम सोन्याचे दागिने २ लाख ८० हजार व ३ हजार रुपये रोख, तर प्रदीप ऊर्फ दीपक विठ्ठल राऊत यांच्या घरातून ३३ ग्रॅम सोन्याचे दागिने १ लाख ६५ हजार व ७ हजार ५०० रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास मंगरुळनाथ पोलिस करीत आहेत.
एकाच गावात Nagi burglary news एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी चोरी केल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या चोरांचा तपास लावावा, अशी मागणी होत आहे. सद्यस्थितीत मंगरुळनाथ पोलिस स्टेशन अंतर्गत चोरीचे प्रमाण वाढले असून, अवैध धंद्ये देखील जोमाने सुरु आहेत. अवैध धंद्याच्या माध्यमातून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. वरली मटका, जुगारात पैसे हारल्यानंतर काही जण पैशाची अडचण भागविण्यासाठी चोरीकडे वळले असल्याचे बोलल्या जात आहे.