विकासाची कामे करा, मी कायम सोबत

26 Dec 2025 17:19:49
भंडारा
Narendra Bhondekar  नगर परिषद निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल आम्ही मान्य करतो. ज्यांना सत्ता दिली, जे निवडून आले त्यांनी शहर विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे, आमदार म्हणून मी त्यांच्या विकास कामांना आपला कायम पाठिंबा असेल, असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.
 

Narendra Bhondekar  
नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. शिवसेनेचा जिल्ह्यातील चारही नगरपालिकांमध्ये पराभव झाला. त्यानंतर प्रथमच ते माध्यमांशी बोलत होते. जे नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष निवडून आले अशा सर्वांचे अभिनंदन करतो. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान विकासाची जी दूरदृष्टी उमेदवारांनी मतदारांपुढे मांडली त्याच दूरदृष्टीच्या मार्गावर चालून शहराचा विकास या लोकप्रतिनिधींनी करावा. अशा विकास कामांसोबत आमदार म्हणून आपण कायम पाठीशी राहू असेही भोंडेकर म्हणाले.
 
 
भंडारा नगर पालिकेच्या Narendra Bhondekar  अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमचा उमेदवार पराभूत झाला. अश्विनी भोंडेकर यांना मागास उमेदवार म्हणून लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न झाला. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असताना मागासवर्गीय उमेदवार म्हणून अपप्रचार केल्या गेलेल्या भोंडेकर यांनी 13 हजाराहून अधिक मते घेतली, हीच खरी शिवसेनेची ताकत आहे असे म्हणत आम्हाला कुणीही कमी लेखू नये, असे आ. भोंडेकर म्हणाले.
 
 
आम्ही विकासाच्या नावाने निवडणूक लढविली. काहींनी विकास कामात आडकाठी आणून भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर केले. चुकीचे भ्रम पसरविल्याने लोकांची नाराजी झाल्याने हे निकाल आले असे आम्ही समजतो. 3000 कोटी रुपयांच्या विकास कामांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. कामे 3 हजार कोटीची असली तरी निधी, एकसंध येत नाही. त्यातला 20 ते 30 टक्के मिळालेल्या निधीला 3000 कोटीचा भ्रष्टाचार दाखवून गैरसमज पसरविण्याचे काम राजकीय पक्षाकडून झाले असा आरोपही आ. भोंडेकर यांनी केला. अपयशाने खचून जाणारा मी नाही. त्यामुळे विकास कामे होतच राहतील. जी कामे सुरू आहेत ती मात्र बंद केली जाऊ नये एवढीच विनंती असल्याचे, आ. भोंडेकर म्हणाले.
मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक तीन मधील ईव्हीएम घोळा संदर्भात बोलताना सर्वपक्षीय मोर्चामध्ये आपण सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी असलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निलंबित न करता निर्दोष सात अधिकाऱ्यांना निलंबन करून मोठ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
Powered By Sangraha 9.0