‘सरपंच साहेब’ आमचे लग्न वैध करून द्या!

26 Dec 2025 17:10:58
विलास नवघरे

समुद्रपूर,
online marriage registration issue विवाह म्हणजे आनंदाचे वातावरण.. अगदी उखाणे घेण्यापासुनचा एक सुखद सोहळा... हौशी आपल्या पत्नीचे नावही बदलवतात.... एकंदरीत सर्व सुखाने सुरू असताना शासनाच्या ऑनलाईनच्या बोगस कार्यप्रणालीने उखाण्यातील नावने पती पत्नीचे नाते तयार झाले असले तरी कागदोपत्री अडचण ठरत आहे. गेल्या ८-९ महिन्यांपासुन लग्न होऊन सासरी आलेल्या मुलींचे नाव शासकीय दफ्तरात नोंदच झाली नसल्याने साहेब आमचे लग्न वैध ठरवून द्या, अशी कळकळीची विनंती नवविवाहीत करीत आहेत.
 

 online marriage registration issue, Mohgaon Gram Panchayat 
तालुयातील मोहगाव ग्रामपंचायत कार्यालयात ७ महिन्यापासून ऑनलाइन विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने नवीन लग्न झालेल्यांना विवाहन प्रमाणपत्रासाठी ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. प्रमाण पत्र नसल्याने नव विवाहीतांचे अनेक शासकीय कामे रखडले आहे. त्यामुळे सरपंच साहेब आमचे लग्न वैध ठरवून द्या असे म्हणण्याची वेळ आली आहे. येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत. मतदार यादीत नाव टाकण्यासाठी विवाह प्रमाणपत्र आवश्यक असते. याशिवाय कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ नवदाम्पत्याला घ्यायचा असल्यास त्याला शासकीय कागदाचा पुरावा लागतो. तोच पुरावा म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्र. परंतु, या एकाच प्रमाणपत्राने नवदाम्पत्य अजूनही शासकीय दरबारी पत्न पत्नी झालेले नाहीत. हे प्रमाण पत्र मिळाल्याशिवाय पत्नीच्या नावाने कोणताही आर्थिक व्यवहारच नव्हे तर शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. यावर तत्काळ उपयोजन करण्याची मागणी विवाहीत युवकांनी सरपंचांकडे केली.
विवाह नोंदणीच्या ऑनलाईन प्रणालीत ७ महिन्यापासून अडचण असून सरपंच विलास नवघरे यांनी संबंधित पंचायत समिती व जिल्हा परिषद विभागाला पत्रही दिले. मात्र, अद्यापही ऑनलाईन विवाह नोंदणी प्रमाणपत्रची अडचण दूरू झाली नाही. यामुळे या गंभीर समस्येकडे वरिष्ठांना तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी सरपंचांनी केली आहे.
 
 
 
मोहगावचे झाले महागाव
मोहगाव ग्रामपंचायतीमध्ये गत ७ महिन्यापासून ऑनलाईन प्रणालीमध्ये मोहगावच्या ठिकाणी महागाव असे दिसते. विवाह नोंदणी करताना नोंदणी प्रमाणिकरण करता येते नाही. यामुळे नवीन विवाह नोंदणी होत नसल्याने मोठी अडच निर्माण झाली आहे. अनेक युवकांना या अडचणीमुळे पत्नीच्या नावाचे, नवीन आधार कार्ड, बँक खाते, पॅनकार्ड विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडून पतीचे नाव जोडल्याशिवाय कोणती शासकीय कागद पत्रे मिळत नाही विशेष म्हणजे प्रसुतीच्या वेळी मातेला आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र ऑनलाईन प्रणालीमध्ये असलेल्या समस्येमुळे विवाहित युवकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. ऑनलाईन प्रणालीमध्ये महागावच्या ठिकाणी मोहगाव असे नाव करून व विवाह नोंदणी करताना नोंदणी प्रमाणिकरण करण्यासाठी सुधारणा करून द्यावी, अशी मागणी सरपंच विलास नवघरे यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0