तभा वृत्तसेवा
मारेगाव,
abhishek-kanake : चंद्रपूर जिल्हा बॉडीबिल्डिंग असोसिएशनद्वारे आयोजित ताडोबा ‘चंद्रपूर श्री चॅम्पियनशिप 2025’ स्पर्धेत तालुक्यातील अभिषेक भय्या कनाके यांनी चतुर्थ स्थान प्राप्त केले. मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील अभिषेक भय्या कनाके या युवकाने 21 डिसेंबर रोजी बॉडीबिल्डिंग असोसिएशन ऑफ चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूरद्वारे आयोजित जिल्हास्तर पुरूष 55 किलो ओपन बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप चंद्रपूर ‘श्री 2025’मध्ये सहभागी खेळाडूंमध्ये चतुर्थ स्थान पटकावले.
पुरूषांच्या शरीरयष्टी आणि शरीर सौष्ठव क्रीडा क्षेत्राच्या प्रचारासाठी त्यांनी दिलेल्या समर्पित सेवेची दखल घेत सन्मान करण्यात आला. त्याने केलेल्या कामागिरीने अभिषेकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिषेक आपल्या यशाचे श्रेय वडील भय्या कनाके, आई छाया कनाके व त्याचे प्रशिक्षक अमित गट्टूवार यांना दिले.