लाखनी
Samarth Vidyalaya Lakhni, राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारा संचालित समर्थ विद्यालय लाखनी येथे राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखनीकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनीचे विश्वस्त डॉ उदय राजहंस, शिवलाल रहांगडाले, एडवोकेट होमेश्वर रोकडे तसेच सामाजिक कार्यकर्ते लवकुश निर्वाण, ग्रामपंचायत मुरमाडी चे सरपंच शेषराव वंजारी, समर्थ विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती विभाताई निखाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखनीकरांच्या तसेच समर्थ रामदास स्वामींच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात हम करे राष्ट्र आराधन या बापूसाहेबांच्या आवडत्या गीताने झाली. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या कबड्डी स्पर्धेचl सामना घेऊन स्वर्गीय बापूसाहेबांना आदरांजली वाहण्यात आली..
या प्रसंगी डॉ उदय राजहंस यांनी बापूसाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला तसेच शिवलाल रहांगडाले यांनी बापूसाहेबांच्या आठवणींना उजाडा दिला. लवकुश निर्वाण यांनी विद्यार्थ्यांना बापूसाहेबांचा आदर्श समोर ठेवून आपलं जीवन घडवाव अस आवाहन केले .याप्रसंगी बोलताना मुरमाडी चे सरपंच शेषराव वंजारी यांनी ही संस्था आणि ही शाळा लाखनी ची शान होती परंतु मधल्या काळात ग्रहण लागले संस्थेत वाद निर्माण झाला परंतु आता जुन्या संचालक मंडळाचा विजय झाल्यामुळे संस्था आणि शाळांची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करून वैभवाच्या शिखरावर समर्थ विद्यालयाला नेण्यात यावे असे आव्हान उपस्थितांसमोर त्यांनी केले. याप्रसंगी बोलतानातर अध्यक्षीय मार्गदर्शनात ऍड होमेश्वर रोकडे यांनी बापूसाहेबांच्या प्रेरक स्मृतींना उजाळा देत विद्यार्थ्यांना शिस्त, अनुशासन यांचे पालन करून समाजात आदर्श नागरिक निर्माण होण्याचे आव्हान केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अतिथींचा परिचय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विभावरी निखाडे यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा नानोटकर तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक अनिल बावनकुळे यांनी केले.