हरिहर शाळेत घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा

26 Dec 2025 14:41:17
नागपूर,
Solid waste management हरिहर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, पारशिवनी येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
 
 
 
345
 
 
या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून प्रफुल्ल धोटे यांनी विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापनाची सविस्तर व कृतीशील माहिती दिली. Solid waste management त्यांनी ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा तसेच घातक कचरा यांचे वर्गीकरण, योग्य विलगीकरण व व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.या कार्यशाळेत शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ताराचंद चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश इटकीकर यांनी केले.
सौजन्य: प्रा. ताराचंद चव्हाण,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0