नागपूर,
pune-nagpur-pune-trains : नाताळ नंतर आता नववर्ष तसेच हिवाळी सुट्टी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने नागपूर- हडपसर- नागपूर विशेष पुणे - नागपूर- पुणे विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी व सुलभ लांब पल्ल्याचा प्रवास करता यावा,यासाठी नागपूर- हडपसर- नागपूर विशेष एक्सप्रेसच्या ८ फेर्या होणार असून गाडी क्रमांक ०१२२१- नागपूर- हडपसर विशेष एक्सप्रेस ही विशेष गाडी सोमवार, बुधवार व शुक्रवार रोजी नागपूर येथून सायंकाळी १९.४० वाजता सुटेल. गाडी २७ डिसेंबर (शुक्रवार), २९डिसेंबर (सोमवार), ३१डिसेंबर (बुधवार) व शनिवार, ३ जानेवारीला ही गाडी दुसर्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता हडपसर (पुणे) येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१२२२- हडपसर- नागपूर विशेष एक्सप्रेस ही विशेष गाडी मंगळवार, गुरुवार व शनिवार रोजी हडपसर येथून दुपारी १५.५० वाजता सुटेल. ही गाडी २८ डिसेंबर (रविवार), (मंगळवार), १जानेवारी २०२६ (गुरुवार), ४ जानेवारी २०२६ (रविवार)ही गाडी दुसर्या दिवशी सकाळी ०६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चालीसगांव, मनमाड, कोपरगांव, बेलापूर, अहमदनगर व दौंड कॉर्ड लाईन हे थांबे देण्यात आले आहे.
पुणे- नागपूर- पुणे विशेष एक्सप्रेस (८ गाडी क्रमांक ०१४१९- पुणे- नागपूर विशेष एक्सप्रेस ही विशेष गाडी शनिवार, सोमवार व बुधवार रोजी पुणे येथून रात्री २०.३० वाजता सुटेल. ही गाडी पुढील तारखांना धावेल. यात २७ डिसेंबर (शनिवार), २९ डिसेंबर (सोमवार), ३१डिसेंबर २०२५ (बुधवार) व ३जानेवारी २०२६ (शनिवार) ही गाडी दुसर्या दिवशी दुपारी १४.०५ वाजता नागपूर येथे क्रमांक ०१४२०- नागपूर- पुणे विशेष एक्सप्रेस ही विशेष गाडी रविवार, मंगळवार व गुरुवार रोजी नागपूर येथून सायंकाळी १६.१० वाजता सुटेल. ही गाडी २८ डिसेंबर (रविवार), ३०डिसेंबर (मंगळवार), १जानेवारी २०२६ (गुरुवार) व ४ जानेवारी २०२६ (रविवार)ही गाडी दुसर्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, बेलापूर, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बदनेरा, धामणगाव, वर्धा व अजनी असे थांबे देण्यात आले आहे.