सूरमणी डॉ. कल्याणी देशमुख यांचे भावपूर्ण गायन !

26 Dec 2025 14:48:11
नागपूर,
Suramani Dr. Kalyani Deshmukh सुप्रसिद्ध ज्येष्ठ तबला वादक व संगीत तज्ञ पं. गोपाळराव वाडेगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित मासिक ‘संगीत साधना’ या गायन-वादन कार्यक्रमात सूरमणी डॉ. कल्याणी देशमुख यांच्या भावपूर्ण गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
 
 
 
song
 
 
डॉ. देशमुख यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग नटभैरव मधील विलंबित एकतालातील ‘जगदंबा भवानी’ या रचनेने केली. त्यानंतर द्रुत लयीतील ‘जप रे मनवा महामंत्र’ सादर करून रसिकांची दाद मिळविली. पुढे राग शुद्ध सारंग मध्ये पं. पद्माकर बर्वे रचित एक बंदिश व तराणा सादर करण्यात आला.Suramani Dr. Kalyani Deshmukh कार्यक्रमाची सांगता त्यांनी संत कबीरांच्या भैरवीतील भजनाने केली.त्यांना तबल्यावर अथर्व शेष व संवादिनीवर संदीप गुरमुळे यांनी संगत केली.कार्यक्रमाच्या प्रारंभी युवा तबला वादक आकाश जवादे यांनी तबला वादन सादर केले. त्रितालातील पेशकार, कायदा, रेला व बंदिशी सादर केली. त्यांना लहरा संगत प्रज्योत म्हैसकर यांनी केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उदय गुप्ते यांनी केले. यावेळी विरत वाडेगावकर, संदेश पोपटकर, डॉ. काणे, डॉ. ओक व गजानन रानडे आदी उपस्थित होते.
सौजन्य:गजानन रानडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0