कुख्यात चोरट्यांकडून 7 दुचाकी जप्त; शिरपूर पोलिसांची कार्यवाही

26 Dec 2025 20:00:03
तभा वृत्तसेवा
वणी, 
two-wheeler-seized-from-thieves : शिरपूर पोलिसांनी कुख्यात सराईत गुन्हेगाराकडून चोरीच्या 7 दुचाकी जप्त केल्या असून, एकूण 2 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कुख्यात सराईत गुन्हेगार शेख आशिक उर्फ तोत्या शेख इब्राहीम (वय 35, कुरई, ता. वणी) याच्याकडे चोरीच्या दुचाकी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 5 हिरो होंडा स्प्लेंडर, 1 हिरो होंडा पॅशन प्रो आणि 1 बजाज 220 सीसी पल्सर अशा विविध कंपन्यांच्या एकूण 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
 
 

y26Dec-Chori 
 
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक संतोष मनवर, इक्बाल शेख, अजय वाभिटकर, सूरज साबळे, अविनाश बानकर, महिला शिपाई रंजना सोयाम, पंकज कुडमेथे, परमेश्वर दराडे, दीपक वाकडे व किरण दासरवार यांनी केली.
वरझडी येथील महाकाली मंदिराची दानपेटी अज्ञात आरोपीने 24 डिसेंबर रोजी फोडून सुमारे 7 हजार रोकड चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तांत्रिक तपासासह गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जलद हालचाली करत आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान दिनेश उंदरु निकुरे (वय 30, वरझडी, ता. वणी, जि. यवतमाळ) यास ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला.
Powered By Sangraha 9.0