यवतमाळ अर्बन बँकेची ‘दिनदर्शिका 2026’चे विमोचन

26 Dec 2025 19:46:21
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
urban-banks-calendar-2026 : यवतमाळ अर्बन बँकेच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘दिनदर्शिका 2026’चे विमोचन रा.स्व. संघाचे नगर संघचालक धनंजय पाचघरे यांच्या हस्ते बँकेच्या मुख्यालयात पार पडले. ‘पंचपरिर्वतन’ ही थीम असलेल्या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर नागरिक कर्तव्य, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण आणि ‘स्व’चा बोध या पंचपरिर्वतना संदर्भातील चित्रे आणि माहिती देण्यात आली आहे.
 
 
y26Dec-Calendar
 
बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे, उपाध्यक्ष अजिंदरसिंह चावला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर कोहरे यांच्यासह महेश सारोळकर, परिमल देशपांडे, वसंता सुपारे, संतोष पेन्शनवार, संजय डेहणकर व तज्ञ संचालक नरेंद्र देशपांडे या संचालकासह बँकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. दिनदर्शिकेच्या निर्मितीत बँकेचा प्रशासन विभाग आणि मार्केटिंग विभागाने विशेष प्रयत्न केले.
Powered By Sangraha 9.0