अल्पवयीन मुलीला विकणाऱ्या महिलेस अटक

26 Dec 2025 19:43:15
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
selling-a-minor-girl : तालुक्यातील अल्पवयीन मुलीला विकणाèया महिलेस अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयात उपस्थित केले असता तिला जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले. मारेगावच्या ग्रामीण भागातील एका अल्पवयीन मुलीला वणी येथील एका आरोपी महिलेने मध्यप्रदेशात विकले. नंतर तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार मारेगाव पोलिसांकडे दाखल करण्यात आली. पोलिसांकडून सखोल शोध सुरू होता. दरम्यान, या महिला आरोपीने मारेगाव पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे.
 
 
ytl
 
 
तहसीलच्या ग्रामीण भागातील ही अल्पवयीन मुलगी वणी येथील एका कॅटरिंगमध्ये काम करीत होती. ती नेहमीप्रमाणे कामावर ये-जा करत होती. 14 नोव्हेंबर रोजी, अल्पवयीन मुलगी कामावर असताना, महिला आरोपी माधुरी चांदेकर हिने फिरायला जाऊ असे सांगून वणी बसस्थानकावर घेऊन गेली. त्यानंतर तिला रेल्वेने मध्यप्रदेशातील उज्जैनला घेऊन गेली. तेथे तिला दुसèया आरोपीला विकले. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. पीडिता कशीतरी उज्जैन पोलिसांपर्यंत पोहोचून तिच्यावर झालेला अत्याचार सांगितला.
 
 
 
तिच्या कुटुंबाशी संपर्क साधल्यानंतर मारेगाव पोलिसांनी तिला मारेगाव येथे आणले. पीडितेच्या जवाबानुसार, महिला आरोपी माधुरी चांदेकर पळून गेली होती. मंगळवारी आरोपी माधुरी चांदेकर स्वतःहून मारेगाव पोलिस ठाण्यात आली. पोलिसांनी माधुरीविरुद्ध पोक्सो आणि अपहरणासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि तिला न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
Powered By Sangraha 9.0