अनिल कांबळे
नागपूर,
married daughter compassionate विवाहित महिलेला विकाेलित नाेकरी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत. वेकाेलित कार्यरत असताना कर्मचारी मृत पावल्यास त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नाेकरी देण्याची तरतूद आहे. त्यामध्ये मृताची पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी इत्यादींना नाेकरी देण्याची तरतूद आहे. परंतु अशा मृत पावलेल्या व्यक्तीची मुलगी जर विवाहित असेल तर ती नाेकरीसाठी पात्र राहणार नाही, अशी तरतूद नॅशनल काेल वेज अग्रीमेंटमध्ये आहे.
या तरतुदीला यापूर्वी विविध न्यायालयात आव्हान देण्यात आले हाेते. त्यामध्ये न्यायालयाने अशा प्रकारची तरतूद ही असंवैधानिक आहे, असे ठरविले हाेते. असे असताना सुद्धा वेकाेलि वारंवार कर्मचाèयांच्या विवाहित मुलीला नाेकरी देण्याचे टाळत आले आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. ढवस यांच्यार्माफत दाखल केलेल्या खुशबू चाेटेल विरुद्ध वेकाेलि या प्रकरणांमध्ये सुप्रीम काेर्टाच्या निकालाचा आधार घेऊन विवाहित मुलीला नाेकरी देण्याचे आदेश दिले हाेते. त्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे आदेश पारित झाले हाेते. या सर्व आदेशांना वेकाेलिने सुप्रीम काेर्टात आव्हान दिले हाेते. मात्र, सुप्रीम काेर्टाने वेकाेलिच्या या सर्व प्रकरणांना खारीज केले आहे .अशा परिस्थितीमध्ये वेकाेलिला विवाहित मुलीला नाेकरी देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. वैशाली काळे या प्रकरणांमध्ये सुद्धा हायकाेर्टाने सदर विवाहित मुलीला नाेकरी देण्याचे आदेश दिले आहे. याचिकाकर्तीर्ते अॅड. अनिल ढवस, अॅड. प्रज्ञा जयस्वाल यांनी बाजू मांडली.