लाखनी,
kabaddi match भंडारा जिल्ह्यात शिक्षणाचे दालन उघडून शैक्षणिक क्षेत्रात वेगळेपण जपणाऱ्या स्व. बापूसाहेब लाखनीकर यांच्या स्मृती दिना निमित्त विद्यार्थ्यांनी त्यांना कबड्डीचा सामना खेळून आगळीवेगळी आदरांजली वाहिली. राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनीच्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे तर जिल्हा बाहेर शिक्षणाची व्यवस्था उभी करण्याचे काम स्व.बापूसाहेब लाखनीकरांनी केले. विदर्भातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये बापूसाहेबांच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे नाव आघाडीवर आहे.
एक विद्यार्थी घडविण्याचे काम या संस्थेने केले. विद्यार्थ्यांना मुलाप्रमाणे जपणाऱ्या या शिक्षण महर्षीचा स्मृतिदिनही लाखनी येथील समर्थ विद्यालयात वेगळ्या पद्धतीने साजरा केला. विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कबड्डीचा सामना खेळविण्यात आला. शिक्षणासोबतच खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीला प्राधान्य देणाऱ्या बापूसाहेबांसाठी ही खऱ्या अर्थाने अनोखी आदरांजली ठरली. यावेळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनीचे विश्वस्त डॉ. उदय राजहंस, शिवलाल रहांगडाले, ऍड.होमेश्वर रोकडे, लवकुश निर्वाण, ग्राम पंचायत मुरमाडीचे सरपंच शेषराव वंजारी, समर्थ विद्यालयाच्या प्राचार्य विभा निखाडे उपस्थित होत्या. शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखनीकरांच्या तसेच समर्थ रामदास स्वामींच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात "हम करे राष्ट्र आराधन" या बापूसाहेबांच्या आवडत्या गीताने झाली. यावेळी बोलताना डॉ.उदय राजहंस यांनी बापूसाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शिवलाल रहांगडाले यांनी बापूसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.kabaddi match अध्यक्षीय मार्गदर्शनात ऍड. होमेश्वर रोकडे यांनी बापूसाहेबांच्या प्रेरक स्मृतींना उजाळा देत विद्यार्थ्यांना शिस्त, अनुशासन यांचे पालन करून समाजात आदर्श नागरिक निर्माण करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक प्राचार्या विभावरी निखाडे यांनी केले. संचालन वर्षा नानोटकर तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक अनिल बावनकुळे यांनी केले.