तस्करांच्या तावडीतून 8 गोवंशाची सुटका

27 Dec 2025 19:35:07
चंद्रपूर, 
cattle-rescued : कत्तलीकरिता एका पिकअप वाहनातून कोंबून वाहतूक करण्यात येत असलेल्या 7 गोवंशाची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तस्करांच्या तावडीतून सुटका करून दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला. या कारवाईत 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी मूल पोलिस ठाणे हद्दीतील नांदगाव येथे करण्यात आली.
 
 
 
CHAND
 
 
 
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे मूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथे नाकाबंदी केली. यावेळी तेथे आलेल्या पिकअप वाहनाला (एमएच 34 बीझेड 9152) अडवून पाहणी केली असता त्यात 8 गोवंशांची (बैल) कत्तलीकरिता अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे दिसून आले. या कारवाईत पोलिसांनी गोवंश व पिकअप वाहन असा एकूण 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात वाहन चालक स्वप्नील प्रल्हाद कुळमेथे (32, रा. येरगाव, ता. पोंभुर्णा), विजय खुशाल बट्टे (27, रा. घडोली, ता. गोंडपिपरी) या आरोपींविरूध्द कलम 11 (1) (घ) (ड) (च) (ज) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 व कलम 5 (अ), 9,11 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम 3 (5), 49 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार धनराज करकाडे, हवालदार चेतन गज्जलवार, सुरेंद्र महतो, गजानन मडावी यांनी केली. पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0