गडचिरोली,
devendra-fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांचे विशेष अभिनंदन करताना सांगितले की, त्यांच्या पुढाकारामुळे गोंडवाना विद्यापीठात यु.आय.टी. संस्थेची स्थापना शक्य झाली. प्रभाकरन यांनी केलेल्या 25 कोटी रुपयांच्या आर्थिक सहकार्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून, पुढे या संस्थेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात प्रभाकरन यांचा मोलाचा वाटा असून आता यु.आय.टी.च्या माध्यमातून उच्च दर्जाचे अधिकारीही तयार होतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासात प्रभाकरन यांनी दिलेली साथ महत्त्वाची आहे, अशी नोंद त्यांनी यावेळी केली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी देखील प्रभाकरन यांचे अभिनंदन करत, त्यांच्या बळावरच यु.आय.टी. उभे राहिले आणि आज स्वप्नपूर्तीची पहिली पायरी साकार झाली आहे, असे गौरवोद्गार काढले.