चार दिवसांत नवीन पाटी न बसविणाऱ्या वाहनांवर कारवाई

27 Dec 2025 17:15:33
अनिल कांबळे

नागपूर,
HSRP number plate enforcement, राज्यातील सर्वच वाहनांना उच्च-सुरक्षा नाेंदणी प्लेट (एसएसआरपी) लावणे अनिवार्य करण्यात आले असून 31 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली हाेती. मात्र, अद्यापही नवीन पाटी न लावणाèया वाहनांबाबत राज्य परीवहन विभाग आणि पाेलिस विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या एक जानेवारीपासून कारवाईचा धडाका सुरु हाेणार असून जवळपास 10 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई हाेऊ शकते. आतापर्यंत शासनाने पाच वेळा मुदतवाढ दिली हाेती. आतापर्यंत नागपुरात 8 लाख 33 हजार 196 वाहनांची नाेंदणी झाली आहे. शहरात जवळपास 18 लाखांपेक्षा जास्त वाहने असून उर्वरित जवळपास 9.50 लाख वाहनांची केवळ 4 दिवासांत नाेंदणी हाेणे शक्य नाही.
 


dh 
परिवहन विभागाने वाहनांना उच्च सुरक्षा नाेंदणी क्रमांकाची पाटी (एचएसआरपी) बसवण्याची मुदत आतापर्यंत पाचवेळा वाढवली आहे. आताही 31 डिसेंबर 2025 पर्यंत पाटी बसवण्याची अंतिम मुदत निश्चित केली हाेती. त्यामुळे नववर्षांच्या पहिल्याच दिवसांपासून एचएसआरपी न लावणाèया वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नाेंदणीकृत झालेल्या सर्व वाहनांना ही पाटी बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणी नियमांचे काटेकाेर पालन हाेणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक वाहनावर एचएसआरपी क्रमांकाची पाटी असणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे वाहन चाेरीच्या घटनांवर नियंत्रण मिळेलच, शिवाय बनावट किंवा बदललेल्या नंबर प्लेटच्या आधारे हाेणाèया विविध गुन्ह्यांनाही आळा बसेल, असा दावा केला जात आहे.
 
 
वारंवार मुदत देऊनही दुर्लक्ष
 
 
शासनाने एचएसआरपी क्रमांक असलेली पाटी बसवण्यासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2025 दिली हाेती. त्यानंतर 30 जूनपर्यंत पहिली, 15 ऑगस्टपर्यंत दुसरी, 30 नाेव्हेंबरपर्यंत तिसरी मदतवाढ देण्यात आली हाेती. त्यानंतरही राज्यात निम्याहून जास्त वाहन धारकांनी एचएसआरपी पाटी लावण्याची तसदी घेतलेली नाही. आता 31 डिसेंबर ही शेवटची मुदत दिली आहे. राज्यातील परिवहन खात्याकडून आता पाचव्यांदा मुदतवाढ देऊन निर्वाणीच्या इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्याचा वाहनधारकांवर ार परिणाम हाेण्याची शक्यता कमीच दिसत आहे. त्यामुळे परिवहन विभाग अ‍ॅक्शन माेडवर आले आहे.
 
 
शहराची स्थिती
विभाग - एमएच - 49(पूर्व) एमएच 31 (शहर)
एकूण ऑर्डर - 2,30477 2,18328
एकूण अपाॅईंटमेंट - 2,27450 2,15482
एकूण िफटमेंट - 2,02546 192722
Powered By Sangraha 9.0