अनिल कांबळे
नागपूर,
job fraud case Nagpur, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई येथे नाेकरी लावून देण्याचे आमिष दाखवून साडेदहा लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी एका युवकाविरुद्ध वाठाेडा पाेलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
गिरीश विनाेद ढाेरे (23, आराधनानगर, वाठाेडा) हा उच्चशिक्षित असून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. 10 मे 2024 राेजी एका नातेवाईकाच्या विवाह समारंभात आराेपी अमाेल विलासराव शिंदे (माहूरगड, जि. नांदेड) याच्याशी विनाेद ढाेरे यांच्याशी ओळख झाली. दाेघांनी गप्पा केल्यानंतर त्याने मुंबईमध्ये असल्याचे सांगून मंत्रालयात ओळखी असल्याची थाप मारली. मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभागात लिपिक पदावर मुलगा गिरीश याला नाेकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला विनाेद ढाेरे हे भुलले. आराेपीने पैसे देण्याबाबत बाेलणी केली. मे 2024 पासून ते 17 ऑक्टाेबर 2025 पर्यंत 10 लाख 51 हजार रुपये आराेपी अमाेल शिंदे याच्या खात्यात टाकले . त्याने महाराष्ट्र शासन मुख्य अभियंता कार्यालय, मुंबई येथे कनिष्ठ लिपिक पदावर रुजू हाेण्याबाबत एक पत्र काढले आणि विनाेद ढाेरे यांना दिले. काही दिवसांनी ते पत्र बनावट असल्याचे समाेर आले. आराेपी अमाेलने त्यांना वेळाेेवेळी बहाणे करीत दुसèया विभागात नाेकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विनाेद ढाेरे यांनी वाठाेडा पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. पाेलिसांनी फसवणुकीचा गुन्हा केला.