थंडीत कपडे उतरविले... अर्धनग्न करत अमानुष घटना

27 Dec 2025 11:12:12
मध्य प्रदेश,
Madhya Pradesh school सीहोर जिल्ह्यातील ग्राम जताखेड़ा येथील सेंट एंजेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना गृहपाठ पूर्ण न केल्याच्या कारणावरून देण्यात आलेल्या अमानवी शिक्षेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कडाक्याच्या थंडीत लहान मुलांना अर्धनग्न अवस्थेत उभे केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला असून, या घटनेची माहिती समोर येताच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
 

Madhya Pradesh school 
पालकांच्या म्हणण्यानुसार, शाळेत गृहपाठ न केल्यास विद्यार्थ्यांना केवळ अपमानास्पद शिक्षा देण्यात आली नाही, तर त्यांच्याकडून मैदानाची सफाई, झाडांना पाणी घालणे आणि झाडू लावण्यासारखी कामेही करून घेतली जात होती. शिक्षण देणाऱ्या संस्थेत अशा प्रकारचे वर्तन होत असल्याचे समजताच पालक आणि ग्रामस्थांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या.या प्रकरणानंतर पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांसह बजरंग दल आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते थेट शाळेत पोहोचले. शाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला. परिस्थिती चिघळत असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. याचदरम्यान शिक्षण विभागाचे अधिकारीही शाळेत पोहोचले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.
 
 
 
घटनेची गंभीरता Madhya Pradesh school  लक्षात घेता जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत शाळेच्या प्राचार्या समरीन खान यांना तत्काळ प्रभावाने पदावरून दूर करण्याचे आदेश दिले. तसेच मान्यता अधिनियमानुसार शाळा व्यवस्थापनावर एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मंडी पोलीस ठाण्यात सादर करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीस तपास सुरू करण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासन आणि पोलिसांनी स्पष्ट केले आहे.प्रशासनाकडून योग्य आणि कडक कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर संतप्त कार्यकर्ते आणि पालक शांत झाले, त्यानंतर परिसरातील परिस्थिती सामान्य झाली. मात्र, शिक्षणाच्या नावाखाली लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0