वर्धा,
bride-and-groom-introduction-meet : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माळी समाज उपवर-वधू पालक परिचय मेळावा आणि शोध जीवनसाथी पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा रविवार २८ रोजी स्थानिक मातोश्री सभागृह, आर्वी रोड वर्धा येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. याच मेळाव्यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा नगरसेवक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अशोक कडू तर उद्घाटक म्हणून जीएसटी उपसंचालक नागपूरचे भूषण निरपासे यांच्या हस्ते होईल. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निळकंठ यावलकर, महात्मा फुले प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रोहिणी पाटील, मेळाव्याचे माजी अध्यक्ष रंगराव सावरकर, वासुदेव कडुकार, सुधाकर मेहरे यांची उपस्थिती राहणार आहे. मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष म्हणून देवळी पंस माजी सभापती दीपक फुलकरी उपस्थित राहतील. दरम्यान, शोध जीवनसाथी या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा माळी महासंघ नागपूरचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या हस्ते होईल.
या मेळाव्याप्रसंगी वर्धेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत झाडे, सचिन होले, वंदना देवघरे, सोनू कुबडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माळी समाज उपवर-वधू परिचय मेळावा आयोजन समितीने केले आहे.