बांगलादेशातील पीडित हिंदूंची भारताकडे धाव

27 Dec 2025 10:31:10
नवी दिल्ली,
hindus in bangladesh बांगलादेश पुन्हा एकदा अस्थिरतेच्या आणि हिंसाचाराच्या गर्तेत सापडला असून, या परिस्थितीत अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले वाढत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अलीकडेच दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांच्या झालेल्या निर्घृण हत्यांनंतर, तेथील हिंदू समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर, संकटात सापडलेल्या हिंदूंनी भारत सरकारकडे भावनिक आवाहन करत “सीमा उघडा, आम्हाला वाचवा” अशी मागणी केली आहे.
 

बांगलादेश  
 
 
व्हॉट्सॲप कॉलवरून पीडितांशी संपर्क
निर्वासित बांगलादेश सनातन जागरण मंच या संघटनेचे नेते निहार हलदर यांच्या मदतीने रंगपूर, चितगाव, ढाका आणि मैमनसिंग येथील हिंदू नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे संवाद व्हॉट्सॲप कॉलद्वारे झाले असून, नागरिकांनी आपली व्यथा मोकळेपणाने मांडली आहे.
“अपमानातून कधी हिंसाचार होईल, सांगता येत नाही”
रंगपूरमधील ५२ वर्षीय एका हिंदू नागरिकाने सांगितले की, केवळ धर्मामुळे रोज अपमान सहन करावा लागत आहे. रस्त्यावर चालताना टोमणे, धमक्या ऐकू येतात आणि हे कधीही मॉब लिंचिंगमध्ये रूपांतरित होऊ शकते, अशी भीती सतावत आहे.
“आम्ही अडकलो आहोत. पळून जाण्याचा मार्ग नाही. दीपू आणि अमृत यांच्यासोबत जे घडले, ते आमच्याबरोबरही होईल या भीतीत जगतोय,” असे त्यांनी सांगितले.
ढाक्यातील हिंदूंमध्ये वाढती अस्वस्थता
ढाक्यातील एका हिंदू रहिवाशाने सांगितले की, दीपू दास यांच्या लिंचिंगनंतर भीती अधिकच वाढली आहे. त्यातच माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांच्या संभाव्य राजकीय पुनरागमनामुळे चिंता अधिक गडद झाली आहे.
“जर बीएनपी पुन्हा सत्तेत आली, तर आमच्यावरचा छळ वाढेल. शेख हसीना यांच्या अवामी लीगशिवाय आमचा कोणीही रक्षक नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“आपण नरसंहाराच्या दिशेने जात आहोत”
सनातन जागरण माचा येथील एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, बांगलादेशात सुमारे २५ लाख हिंदू राहतात. “ही संख्या दुर्लक्षित करता येणार नाही.hindus in bangladesh भारतातील काही हिंदू संघटना केवळ प्रतीकात्मक भूमिका घेत आहेत. प्रत्यक्षात आम्ही हळूहळू नरसंहाराच्या दिशेने चाललो आहोत,” असा गंभीर इशारा त्यांनी दिला.
सीमा उघडली तरी स्थलांतर नाही, पण सुरक्षितता मिळेल
मैमनसिंग येथील एका रहिवाशाने सांगितले की, सीमा उघडल्यास सर्व हिंदू भारतात पळून जातील, ही भीती निराधार आहे.
“पण किमान हिंसाचाराच्या काळात जीव वाचवण्यासाठी सुरक्षित मार्ग मिळेल,” असे ते म्हणाले.
ढाक्यातील आणखी एका हिंदू नागरिकाने भावना व्यक्त करताना सांगितले,
“आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट स्वप्न जगत आहोत. भारतीय सीमा उघडली, तर छळ सहन करणाऱ्यांना तरी थोडा दिलासा आणि सुरक्षिततेची आशा मिळे
Powered By Sangraha 9.0