६ हजार थेट 'खात्यात' जमा होणार? पण अटी बंधनकारक

27 Dec 2025 14:44:22
मुंबई,
PM Kisan Yojana पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजना (PM Kisan Yojana) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. हा लाभ दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो. आतापर्यंत २१ हप्ते वितरित झाली असून, नवीन वर्षात २२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
 

PM Kisan Yojana  
केंद्र सरकारने या नव्या हप्त्यासाठी एक महत्त्वाची अट घालली आहे. यंदा PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला Farmer ID तयार करून तो योजनेशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. या आयडीशिवाय शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारकडून दिला आहे.Farmer ID म्हणजे शेतकऱ्यांचा डिजिटल प्रोफाइल, ज्यामध्ये वैयक्तिक माहिती, जमिनीची माहिती, पीकाचे प्रकार आणि क्षेत्रफळ यासह इतर महत्त्वाची माहिती नोंदवली जाते. यामुळे शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो, हे अचूक समजण्यास मदत होते आणि बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण ठेवता येते. भविष्यात राबविण्यात येणाऱ्या थेट लाभ योजनांसाठी हा आयडी अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
 
 
 
Farmer ID तयार PM Kisan Yojana करण्यासाठी AgriStack Portal वर जाऊन ‘Create New User’ या पर्यायावर क्लिक करावे लागते. अटी व शर्ती स्वीकारून फॉर्म सबमिट करावा, त्यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीद्वारे व्हेरिफिकेशन करावे. त्यानंतर पासवर्ड तयार करून लॉगिन करावा. ‘Farmer Type’ मध्ये ‘Owner’ निवडून ‘Fetch Land Detail’ मध्ये जमिनीचा खासरा क्रमांक व इतर माहिती नोंदवावी.
 
 
सर्व माहिती भरल्यानंतर ‘Social Registry Tab’ मध्ये कुटुंबाची माहिती भरावी, ‘Department Approval’ मध्ये Revenue Department निवडावे आणि शेवटी ‘Consent’ टिक करून डिजिटल स्वाक्षरी करावी. या प्रक्रियेनंतर Farmer ID तयार होतो, आणि तो PM Kisan योजनेसाठी बंधनकारकपणे लिंक करणे आवश्यक आहे.केंद्र सरकारच्या या नव्या अटीमुळे शेतकऱ्यांनी वेळेत Farmer ID तयार करून योजनेसह लिंक करणे गरजेचे आहे, अन्यथा २२ वा हप्ता मिळवणे शक्य होणार नाही.
Powered By Sangraha 9.0