चंद्रपूर-पुणे रेल्वे गाडीची समस्या सोडवा

27 Dec 2025 15:08:16
चंद्रपूर, 
chandrapur pune train service चंद्रपूर-पुणे आणि चंद्रपूर- मुंबईसाठी दररोज रेल्वे गाडी असावी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य रेल्वे समस्या सोडविण्याबाबत चंद्रपूर रेल प्रवासी सेवा संस्थेच्या सदस्यांनी 21 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच याबाबत सविस्तर चर्चा करीत, त्यांना मागण्यांचे निवेदनही सादर केले.
 

chandrapur pune train 
 
 
यावेळी गडकरी यांनी पालिका निवडणुकीनंतर या संदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच 26 डिसेंबर रोजी बल्लारपूर मार्गावरील मातोश्री वृध्दाश्रम येथे माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची भेट घेऊन रेल्वेच्या मागण्यांवर त्यांच्याशीही सविस्तर चर्चा केली.chandrapur pune train service यावेळी शोभाताई फडणवीस यांनी, निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
Powered By Sangraha 9.0