कॉग्रेसची अवस्था न घरका न घाटका

27 Dec 2025 05:30:00
 
 
वेध
चंद्रकांत लोहाणा
 
 
congress संस्कृती आणि दिशाहीन झालेला काँग्रेस पक्ष सत्तेसाठी एवढा हापापलेला आहे की, विदेशामध्येही भाजपाच्या केंद्र सरकारला बदनाम करुन राहुल गांधी यांना सत्ता हस्तगत करायची आहे. स्वकर्तुत्वाने काँग्रेसला सत्ता मिळणे शक्यच नाही तर दुरापास्त आहे. भारतीय नागरिक आणि या देशाच्या संस्कृतीशी समरस होईल, असा राहुल गांधी जवळ ना कोणता मुद्दा आहे, ना कोणतेही व्हीजन. यांचे कर्तुत्वही देशाला मान खाली घालवणारे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला दररोज उठसुठ बदनाम करण्याचे षडयंत्र काँग्रेसने अतीशय नियोजन करुन आखले आहे. राहुल गांधी यांचा प्रत्येक विदेश दौरा त्यासाठीच असतो की, काय अशी दाट शंका आता नागरिकांना येवू लागली आहे. राहुल गांधी यांच्या नुकत्याच झालेल्या जर्मनीच्या दौèयाने ही बाब पुन्हा अधोरेखीत झाली आहे. लोकशाही मार्गाने आपण निवडुण येऊ शकत नाही, हे विदारक सत्य काँग्रेस पक्षाला उमगले आहे. त्यामुळे मागील अकरा वर्षाचा कालखंड सत्तेविना घालविलेल्या काँग्रेसची अवस्था तर राहुल गांधी यांनी ‘न घरका न घाटका’ अशी करुन ठेवली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कार याच्याशी या पक्षाचा काडीमात्रही संबंध नसताना लोकांनी तरी का बर या पक्षाला निनवडुण द्याव? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून हटविण्यासाठी राहुल गांधी यांनी आपल्या देशामध्ये अनेक प्रयोग करुन बघितले. नेपाळ, श्रीलंता या देशामध्ये युवकांनी सरकार विरुध्द केलेला उठावाच्या पार्श्वभूमीवर येथेही तरुणांची डोकी भडविण्याची काँग्रेसची चाल फसली. निवडणुक आयोग व त्यासारखा अन्य संस्थांना लक्ष करुनही आपण सत्तेत खुर्ची पर्यंत पोहोचू शकत नाही, हे लक्षात आल्यावर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना परदेशामध्ये बदनाम करण्याचा कट पध्दतशीरपणे आखल्याचे दिसून येत आहे.
 
 

congress 
 
जगामध्ये असा एकही नेता नाही, जे परकीय भूमीमध्ये आपल्याच देशाची बदनामी करुन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करीत असेल. खरतर परकीय भूमीवर स्वकीयांचे असे कृत्य देशद्रोही यासारखा गुन्हा मानला जायला हवा. परंतु, दुदैवाने तसे होतांना दिसून येत नाही. आपल्या घराणेशाहीची परंपरा कायम ठेवण्यासाठी कोणीएक देशालाच वेठीवर धरत असेल तर हे एक अक्षम्य पाप आहे. त्याचीच सजा आज काँग्रेस पक्ष भोगीत आहे. जनतेला गृहीत धरुन अनेक दशके सत्ता काँग्रेसने उपभोगली. सत्तेच्या आवेशाखाली प्रत्येकवेळी विरोधकांना ठेचुन काढण्याची या पक्षाची मनोवृत्ती. फक्त आम्हीच लायक ही या पक्षाची मगरुरी. त्यामुळे सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची यांची तयारी. हीच परंपरागत मनोवृत्ती आजही काँग्रेस पक्षाला चिकटली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष बेताल झाला आहे. जनतेने 2014 पुर्वीचा आणि त्यानंतरचा काळ बघितला आहे. असंख्य घोटाळे आणि मानवतेला लाजवेल असा आणिबाणीचा क्रृर काळ लोकांनी अनुभवला आहे. आपल्या कार्यकाळामध्ये अनेक संस्थाना आपली स्थावर मालमत्ता समजुन काँग्रेस पक्षाने आपल्या स्वार्थासाठी उपयोग केला आहे. त्यासाठी प्रत्येकवेळी येथील हिंदूना वेठीस धरुन दुय्यम नागरीकांसारखी वागणुक दिली आहे. या सर्व बाबींना छेद देत नरेंद्र मोदी यांनी खèया अर्थाने 2014 साली लोकशाहीची पुर्नस्थापना केली. नेमके हेच काँग्रेस पक्षाला नको आहे. सत्ता उपभोगने हा आमचा जन्मसिध्द अधिकार असल्याच्या तोèयात आजही राहुल गांधी आहेत. राहुल गांधी हे अपघाताने राजकारणात आले की, त्यांना त्यात रसच नाही. प्रत्येक राज्यातील विधानसभा निवडणुका व लोकसभा निवडणुका राहुल गांधी यांच्याच नेतृत्वात लढविल्या गेल्या. केंद्रात सत्ता स्थापनेसाठी दोन डझन पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पराभूत करण्यासाठी जीवाचे रान केले, नको ते आरोप केले.congress असे असतांनाही तीन लोकसभा निवडणुका व अनेक राज्यातील सत्ता काँग्रेसने गमावली. राहुल गांधी यांचे नेतृत्व जनतेला मान्य नसल्याचे अनेक निवडणुकात सिध्द झाले आहे. विदेशात भारताच्या प्रतिमेला तडे जावेत असा राहुल गांधी यांचा सतत प्रयत्न असतो. विदेशात जावून वाटेल ते बरळण्याची सवय त्यांची गेलेली नाही. जेव्हा जेव्हा काँग्रेसचे युवराज विदेश दौèयावर गेले तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेवर बिनबुडाचे आरोप करुन त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. हे राष्ट्र आणि जनतेच्या हिताचे नक्कीच नाही.
 
9881717856
...........
Powered By Sangraha 9.0