नागपूर रेल्वे प्रवास १८ रुपयांनी महागला

27 Dec 2025 20:36:45
नागपूर,
train-travel-from-nagpur : रेल्वेच्या नवीन दरानुसार नागपूर ते मुंबई १७ रुपयांनी तर नागपूर ते पुणे १८ रुपयांनी भाडे वाढले आहे. प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. भाडेवाढ झाल्यामुळे रेल्वेने जाणार्‍या प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे आहे. मुख्यत: लांब पल्ल्याच्या म्हणजे २१५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.
 
 

ngp 
 
 
त्यानुसार मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या सर्व नॉन-एसी आणि एसी वर्गांमध्ये प्रतिकिलोमीटर २ पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे. तर शयनयान श्रेणीच्या तसेच प्रथम श्रेणीच्या सामान्य प्रवासासाठी प्रतिकिलोमीटर १ पैसा वाढ करण्यात आली आहे.नागपूर ते मुंबई हे सुमारे ८३८ किलोमीटर अंतर असून नवीन दररचनेनुसार या मार्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना प्रतिकिलोमीटर २ पैसे या हिशेबाने १७ रुपयांची अतिरिक्त वाढ सहन करावी लागत आहे. तर पुण्यासाठी सुमारे ८९० किलोमीटर अंतर आहे. त्यानुसार प्रवाशांना १८ रुपयांपर्यंत अतिरिक्त भाडेवाढ झाली आहे.
 
पाच वर्षांत तीन वेळा दर वाढ
 
 
मुख्यत: लांब पल्ल्याच्या खिशाला कात्री लावणारी ही भाडेवाढ आहे. गेल्या पाच वर्षांत तीन वेळा रेल्वेने तिकीट दर वाढविले आहे. सामानावरही वजनानुसार दर वाढविण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे फेब्रुवारीतील अर्थसंकल्पाच्या आधीच ही भाडे वाढ करण्यात आली होती, अशी माहिती भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंत कुमार शुक्ला यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0