उत्तर प्रदेशात एसआयआर प्रक्रिया पूर्ण; २.८९ कोटी मतदारांची नावे वगळली

27 Dec 2025 10:13:35
लखनौ,
uttar pradesh sir उत्तर प्रदेशात विशेष सघन पुनरिक्षण (SIR) प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्याची अंतिम आकडेवारी आणि प्रारूप मतदार यादी ३१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, राज्यातील तब्बल २ कोटी ८९ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, जे एकूण मतदारांच्या सुमारे १८.७ टक्के इतके आहे. एसआयआरपूर्वी राज्यात १५ कोटी ४४ लाख नोंदणीकृत मतदार होते. मात्र पुनरिक्षणानंतर मोठ्या प्रमाणावर नावे वगळली गेल्याचे चित्र समोर आले आहे.
 

SIR प्रकिया पूर्ण  
 
 
लखनौमध्ये सर्वाधिक परिणाम, १२ लाख मतदार कमी
राज्याची राजधानी लखनौमध्ये एसआयआरचा मोठा परिणाम दिसून आला आहे. येथे अंदाजे १२ लाख मतदारांची नावे कमी झाली आहेत. लखनौमधील सुमारे ४० लाख मतदारांपैकी आतापर्यंत ७० टक्के म्हणजेच सुमारे २८ लाख मतदारांनी एसआयआर फॉर्म भरले आहेत.
स्थलांतर, मृत्यू आणि डुप्लिकेट नावे कारणीभूत
वगळण्यात आलेल्या २.८९ कोटी मतदारांपैकी १.२५ कोटी मतदार कायमचे स्थलांतरित झाल्याचे समोर आले आहे, ४५.९५ लाख मतदारांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, तर २३.५९ लाख मतदारांची नावे डुप्लिकेट असल्याचे आढळले आहे. याशिवाय, ९.५७ लाख मतदारांनी फॉर्म सादर केले नाहीत, तर सुमारे ८४ लाख मतदार बेपत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
लखनौतील डुप्लिकेट मतदारांची संख्या चिंताजनक
लखनौमध्ये वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी ५.३६ लाख नावे डुप्लिकेट असल्याचे स्पष्ट झाले आहे.uttar pradesh sir त्यामुळे शहरातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर शुद्धीकरण झाले आहे.
लखनौ विभागातील फॉर्म भरण्याचे प्रमाण
लखनौ, मलिहाबाद आणि मोहनलालगंज येथील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये फॉर्म भरण्याचे प्रमाण तुलनेने जास्त राहिले.
बक्षी का तालाब – ७८%
लखनऊ पश्चिम – ७०%
सरोजिनी नगर – ६९%
लखनऊ मध्य – ६५%
लखनऊ पूर्व – ६३%
लखनऊ उत्तर – ६२%
लखनऊ कॅन्ट – ६१%
पुढील वेळापत्रक जाहीर
एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर,
प्रारूप मतदार यादी – ३१ डिसेंबर २०२५
दावे व आक्षेप नोंदवण्याची मुदत – ३१ डिसेंबर २०२५ ते ३० जानेवारी २०२६
अंतिम मतदार यादी – २८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0