खासदाराच्या सत्कार कार्यक्रमात ‘राडा’

27 Dec 2025 17:38:48
तभा वृत्तसेवा

यवतमाळ,

Sanjay Deshmukh यवतमाळ नगर परिषदेत 58 पैकी शून्य असा उबाठाचा पराभव झाला आहे. या मागे खासदार संजय देशमुख यांची निष्क्रिय भूमिका जबाबदार असल्याने संतोष ढवळे यांनी खासदार देशमुख यांचा उपरोक्त सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख किशोर इंगळेसह अनेक पदाधिकाèयांनी राडा घालत कार्यक्रम उधळला.
 
 

Sanjay Deshmukh 
यवतमाळ नगर परिषदच्या निवडणूकीत स्वतःच्या पक्षाची पाटी कोरी ठेवल्याबद्दल खा. संजय देशमुख यांचा जाहीर सत्कार कार्यक़्रमाचे येथील उत्सव मंगल कार्यालयात दुपारी 1 वाजता आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरु होण्यापुर्वीच उबाठाचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड व जिल्हा प्रमुख किशोर इंगळे हे समर्थकासोबत कार्यक्रम स्थळी येऊन कार्यक़्रमाला तीव्र विरोध करत जोरदार घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप केले. तसेच व्यासपीठावर लावण्यात आलेले सत्काराचे बॅनर फाडण्यात आल्याने परिस्थिती अधिकच चिघळली होती.
यादरम्यान संतोष ढवळे यांना हा सत्कार कार्यक्रम घेऊन तुम्ही पक्षाची बदनामी करता का अशी विचारणा केली. खासदार व पक्षाची बदनामी करत नाही, असे संतोष ढवळे यांनी उत्तर देत संतोष ढवळे व त्यांचे समर्थक त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र, परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ नाही. यासाठी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अवधूतवाडी पोलिस पथकांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना दूर करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण झाले होते.


उबाठातील वाद चव्हाट्यावर
यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणूकीवरुन उबाठातील वाद चव्हाट्यावर आला आहे. संतोष ढवळे यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. मात्र, जोपर्यंत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार नाही, तोपर्यंत मी शिवसेनेतचे काम करणार असल्याचे संतोष ढवळे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आज झालेल्या राड्यामुळे यवतमाळातील उबाठातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीवर याचा काय परिणाम होणार हे येणारी वेळ सांगेल.
Powered By Sangraha 9.0