चर्चेला तिव्र वळण अदानीं का आले? राऊतांनी सांगितले खरे कारण

28 Dec 2025 11:00:47
बारामती,
Gautam Adani राज्याच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली आहे. बारामतीमध्ये आयोजित एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज बारामती दौऱ्यावर येऊन 'शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस' (AI) या केंद्राचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंबाचे सर्व सदस्य एकत्र आले असून, राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाची मोठी चर्चा सुरू आहे.
 
 
Gautam Adani, Baramati, Shard Pawar, Shard Pawar Center of Excellence, Artificial Intelligence, AI, Political Reactions, Sanjay Raut, Ajit Pawar, Pawar Family, Shiv Sena, Adani Group, Maharashtra Politics, Adani Influence, Mumbai, BJP, Modi Government, Family Ties, Political Divide, Political Tensions, Maharashtra News, Political News, Adani Controversy, Political Leaders, Maharashtra Events, Regional Politics, Maharashtra Developments, Baramati Event, Political Shifts
 
गौतम अदानी यांचे बारामतीतील आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अदानी यांनी स्वयंचलित कार चालवली आणि यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत बसले होते. या घटनावरून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. यावरून अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
 
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गौतम अदानींच्या बारामती दौऱ्याबद्दल पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या. संजय राऊत म्हणाले की, "शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध राजकीय नाहीत, ते पूर्णपणे कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. पवार साहेब आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हे त्यांचे वैयक्तिक अधिकार आहेत." राऊत यांनी अजित पवारांच्या उपस्थितीवरही भाष्य करत, "पवारांचे संपूर्ण कुटुंब एकत्र आले आहे. यामध्ये ज्यांनी पक्ष फोडला, ते अजित पवारही उपस्थित आहेत. हे सुद्धा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे," असे सांगितले.
 
 
तसेच, संजय राऊत Gautam Adani यांनी शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या संबंधांवर आणखी एक सूचक विधान केले. "पवारांचा पक्ष फोडण्यामागे गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी माहिती होती. अजित पवारांना पश्रातून फोडण्यास अदानी होते, असे मी वाचले आणि ऐकले आहे. आता खरे काय तेच सांगतील," असे ते म्हणाले.राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एक नवा वाद उफाळला आहे. संजय राऊत यांनी अदानी यांची आलोचना करत, मुंबईवर त्यांच्या वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त केली. "मुंबईवरील अदानींचा ताबा हा महाराष्ट्र आणि मुंबईसाठी अत्यंत घातक आहे. अनेक उद्योगपती आहेत, पण अदानी यांचा हव्यास इतर कोणत्याही उद्योगपतीने दाखवलेला नाही. ज्या पद्धतीने भाजप आणि मोदी सरकार त्यांना समर्थन देत आहे, त्यावर आम्ही नैतिक विरोध करत आहोत," असे राऊत यांनी स्पष्ट केले.
 
 
यावेळी बारामतीतील Gautam Adani कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार कुटुंबाचा एकत्र येणे, अजित पवार आणि गौतम अदानी यांची जवळीक आणि राजकीय चर्चेला नवीन वळण देणारे या घटनेचे महत्व लक्षात घेत, राज्याच्या राजकारणात एक नवा मोर्चा उघडला जातो की काय, याची पाहणी केली जात आहे.गौतम अदानींच्या बारामती दौऱ्यावर राजकीय प्रतिक्रिया तसेच पवार कुटुंबाचे एकत्र येणे ही स्थिती राज्यातील आगामी राजकीय घडामोडींना आकार देईल, यावर लक्ष ठेवले जात आहे.अशा प्रकारे, आजचा हा कार्यक्रम आणि त्यानंतरच्या चर्चांमुळे बारामतीतील घटनाक्रम राज्याच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण वळण ठरला आहे.
Powered By Sangraha 9.0