जम्मूमध्ये ३० हून अधिक पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय, सुरक्षा यंत्रणा सतर्क

28 Dec 2025 13:01:28
श्रीनगर, 
30-pakistani-terrorists-active-in-jammu जम्मू-काश्मीरमध्ये यंदाच्या हिवाळ्यातही दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा पूर्णतः सतर्क आहेत. गुप्तचर संस्थांनी इशारा दिला असून जम्मू विभागात सध्या ३० हून अधिक पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. या संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता भारतीय सेनेने दहशतवादविरोधी मोहिमा अधिक तीव्र केल्या आहेत. चिल्लई कलान काळातही लष्कर आणि सुरक्षा दलांकडून कोणतीही ढिलाई घेतली जात नाही.
 

30-pakistani-terrorists-active-in-jammu
 
गुप्तचर आणि संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, सततच्या कारवायांमुळे दबावात आलेले दहशतवादी आता किश्तवाड आणि डोडा जिल्ह्यातील उंच तसेच मध्यम उंचीच्या डोंगराळ भागात लपून बसले आहेत. या परिसरात सामान्य नागरिकांची उपस्थिती अत्यंत कमी आहे. हिवाळ्याचा फायदा घेत दहशतवादी पुन्हा एकत्र येण्याचा आणि स्वतःला पुनर्गठित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज आहे. पूर्वी हिवाळा म्हणजे कमी हालचालींचा काळ मानला जात होता, मात्र आता भारतीय लष्कर ही धारणा बदलत आहे. २१ डिसेंबरपासून सुरू झालेल्या चिल्लई कलांसोबतच सेनेने बर्फाच्छादित आणि अतिशय दुर्गम भागांमध्ये आपली उपस्थिती वाढवली आहे. 30-pakistani-terrorists-active-in-jammu उंच भागांत तात्पुरत्या नजर ठेवणाऱ्या चौक्या आणि फॉरवर्ड विंटर बेस उभारण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत दहशतवादी सुरक्षा दलांच्या नजरेतून सुटू नयेत, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. अत्यल्प तापमान आणि जोरदार हिमवृष्टी असूनही दहशतवादविरोधी कारवाया अखंडपणे सुरू आहेत.
सेनेची पथके डोंगरशिखरे, जंगले आणि दुर्गम दऱ्यांमध्ये नियमितपणे शोधमोहीम राबवत आहेत. दहशतवाद्यांना सुरक्षित आसरा मिळू न देणे आणि त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे, हा या कारवायांचा मुख्य हेतू आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या रणनीतीमुळे दहशतवाद्यांच्या पुरवठा साखळीवरही मोठा परिणाम झाला असून ते आता वस्तीच्या भागांकडे सरकू शकत नाहीत. या मोहिमांमध्ये भारतीय सेनेसोबत जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, वनरक्षक आणि व्हिलेज डिफेन्स गार्ड्स यांचाही सहभाग आहे. सर्व यंत्रणा मिळून गुप्त माहितीचे विश्लेषण करत असून, दहशतवादी हालचाली आढळताच तात्काळ कारवाई केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांचा अंदाज आहे की स्थानिक पातळीवरील पाठिंबा कमी झाल्याने आणि निचल्या भागांमध्ये कडक नजर ठेवल्यामुळे दहशतवादी अधिकाधिक एकाकी पडले आहेत. 30-pakistani-terrorists-active-in-jammu काही ठिकाणी दहशतवाद्यांनी गावकऱ्यांवर अन्न आणि आसऱ्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना फारसे यश मिळाले नाही. विशेष प्रशिक्षण घेतलेल्या विंटर वॉरफेअर युनिट्सना संवेदनशील भागांत तैनात करण्यात आले आहे. ड्रोन, थर्मल इमेजर आणि ग्राउंड सेन्सर्सच्या मदतीने बर्फाच्छादित प्रदेशातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षा दलांचा स्पष्ट संदेश आहे की आता प्रतिकूल हवामानही दहशतवाद्यांसाठी ढाल ठरणार नाही.
Powered By Sangraha 9.0