चन्नावार ई-विद्या मंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

28 Dec 2025 19:33:54
वर्धा, 
channawar-e-vidya-mandir : येथील चन्नावर ई-विद्या मंदिरात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत आयोजित दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत आनंद, संस्कार, सर्जनशीलता आणि मूल्यशिक्षण यांचा सुंदर संगम साकारण्यात आला.
 
 
LKJ
 
 
 
पूर्व-प्राथमिक ते इयत्ता तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून येळाकेळीचे सरपंच भारती चलाख, किशोर भूत, शशिकांत चौधरी, शरद इंगळे, संदीप पद्मावार, दिनेश चन्नावार, प्राचार्य अपूर्वा पांडे, पूजा कपूर आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली गणेश वंदना, नृत्यनाट्य, समूह नृत्ये व गिते यातून चंद्र, तारे, आकाश आणि आनंदी बालविश्वाचे मनोहारी चित्र साकार झाले. तालबद्ध हालचाली, भावपूर्ण अभिनय आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. बालवयातच शिस्त, सहकार्य व कला-संस्कार कसे रुजवले जातात याचे प्रभावी दर्शन या कार्यक्रमातून घडले.
 
 
इयत्ता चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यात रामायणातील विविध प्रसंगांचे नृत्य, नृत्यनाट्य, संगीत व कथाकथनाच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण करण्यात आले. रामजन्म, बालकांड, वनवास, सीता स्वयंवर, हनुमान चरित्र, रावण प्रवेश, राम-रावण युद्ध व रामराज्य अशा प्रसंगांचे सजीव चित्रण विद्यार्थ्यांनी अत्यंत परिणामकारकपणे केले. या सादरीकरणांतून धर्म, कर्तव्य, त्याग, सत्य, निष्ठा व मानवतावादी मूल्यांचा प्रभावी संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कला-कौशल्याचे भरभरून कौतुक केले. तर शिक्षकांनी सादर केलेल्या विशेष नृत्य व सादरीकरणांनी कार्यक्रमात अधिक रंगत आणली.
संचालन पूजा कपूर, कांचन मिश्रा, अमिता गाडे, श्वेता गांधी व विद्यार्थ्यांनी केले.
Powered By Sangraha 9.0