दिगंबर समाजाचा इशारा मोर्चा धडकला शिरपूर पोलिस स्टेशनवर

28 Dec 2025 18:36:22
शिरपूर जैन,
Digambar community protest, दि. १८, १९ व २६ डिसेंबर रोजी अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरामध्ये दोन पंथीयांच्या कामगारांमध्ये घटना घडल्या होत्या. सदर घटनेमध्ये दिगंबर समाजाचे दोन पुजारी गंभीर जखमी झाले होते. प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी व गुन्हेगारावर कडक कायदेशीर करण्यासाठी आज, २८ डिसेंबर रोजी दिगंबर समाजाचा इशारा मोर्चा पोलिस स्टेशनवर धडकला.
 
 

Digambar community protest, 
दि. १८ १९ व २६ डिसेंबर रोजी येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा कारणावरून दोन्ही पंथीयांच्या कामगारांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. दिगंबर व श्वेतांबर या दोन्ही बाजूच्या परस्पर फिर्यादीवरून २० कामगारांवर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. सदर घटना घडल्यानंतर दि. २६ डिसेंबर रोजी पुन्हा दिगंबर पंथीयाच्या पुजार्‍यास चार ते पाच कामगारांनी बेदमपणे मारहाण केली होती. जखमी विजय जैन या पुजार्‍यास वाशीम येथे रुग्णालयात अती दक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सदर प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी व गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यासाठी दिगंबर समाजाने आज, २८ डिसेंबर रोजी सिद्धांतसागर महाराज व तात्या भैया यांच्या नेतृत्वात हा इशारा मोर्चा शिरपूर पोलिस स्टेशन वर धडकला. दरम्यान शेकडो दिगंबर समाजाचे महीला व पूरुष या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. झालेल्या घटनेबाबत दिगंबर समाजाच्या संतप्त भावना यावेळी दिसून आल्या. यावेळी तात्या भैयानी उपस्थित समाजाला मार्गदर्शन करताना म्डटले की, मंदिराच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी प्रशासनाने मदत करावी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती किंवा ज्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावर उत्सव काळामध्ये दरवर्षी प्रतिबंधात्मक कारवाई प्रशासनातर्फे करण्यात येते अशा लोकांना मंदिर व मंदिर परीसरात येण्यास बंदी करावी, अशा मागण्यांचे निवेदन त्यांनी यावेळी ठाणेदार केशव वाघ यांना दिले. सदर मोर्चामध्ये शिरपूर परिसरातील शेकडो दिगंबर
Powered By Sangraha 9.0