मंगरुळनाथ,
Laxmichand High School alumni reunion 2025 शेलू बाजार येथील लक्ष्मीचंद हायस्कूलच्या १९७९-—८० या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन तब्बल ४५ वर्षांनंतर के. डी. चांडे इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर सायन्स कॉलेज येथे पार पडला. दीर्घ काळानंतर पुन्हा एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या भेटीने शालेय जीवनातील सुवर्णकाळ पुन्हा एकदा जिवंत झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक पी. एस. राऊत होते. तर एन. आर. सुर्वे व पी. एल. इंदोरे म्हणून रमेश शेगोकर, डॉ. तारकस यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी एक दिवसीय शाळा भरवण्यात आली. शिक्षकांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. सर्वजण रांगेत वर्गखोलीत गेले. त्यानंतर शाळेतील जुन्या परंपरेनुसार शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली. ही हजेरी केवळ नावांची नव्हे, तर आठवणींची, ऋणानुबंधांची आणि जिव्हाळ्याची होती. तसेच कोणता विद्यार्थी किती दिवस गैरहजर होता त्याला शाळेत बोलवण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत होत्या हे शिक्षकाने व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव, शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेने दिलेले संस्कार व जीवन घडणीतील योगदान याविषयी मनोगते व्यक्त केले.
छायाचित्र - माजी शिक्षकांचा सत्कार करताना गाजी विद्यार्थी